Weight Loss Pizza Recipe : ना मैदा ना जड ब्रेड; 'असा' बनवा चटपटीत अन् हेल्दी पिझ्झा, डाएट बिघडणार नाही

Shreya Maskar

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी तुम्ही डाएट करत असाल, मात्र तुम्हाला चटपटीत पण हेल्दी खायचे असेल तर झटपट हा हेल्दी पिझ्झा बनवा. रेसिपी नोट करा.

Weight Loss | pinterest

पिझ्झा साहित्य

पिझ्झाचा बेस बनवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, मखाना, रवा, मीठ, पाणी इत्यादी साहित्य लागते. पिझ्झाच्या टॉपिंगसाठी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, मका, ऑलिव्ह तेल, पिझ्झा सॉस, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स, चीज इत्यादी साहित्य लागते.

Pizza Ingredients | pinterest

मसूर डाळ

पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेली मसूर डाळ आणि मखाना मिक्सरमध्ये गुळगुळीत होईपर्यंत वाटून घ्या. घट्ट मिश्रण तयार करण्यासाठी त्यात रवा आणि मीठ घाला. हे मिश्रण झाकून ५ ते ६ तास थोडे आंबवण्यासाठी ठेवा.

Masoor Dal | pinterest

ऑलिव्ह ऑइल

एका पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल टाकून त्यात सर्व भाज्या हलक्या परतून घ्या. तुम्ही शिमला मिरची, कांदा, टोमॅटो यांचे बारीक काप करा आणि मका उकडून घ्या.

Olive Oil | pinterest

पिझ्झा बनवा

एका पॅनवर पीठाचे मिश्रण पसरवा त्याला पिझ्झा बेसचा आकार द्या आणि दोन्ही बाजूंनी हलकेच शिजवा. हे सर्व करताना गॅस कमी आचेवर ठेवून द्या. जेणेकरून बेस जळणार नाही.

Pizza | google

पिझ्झा टॉपिंग

आता त्यावर पिझ्झा सॉस चांगला पसरून घ्या. त्यानंतर परतलेल्या भाज्या टाकून एक वाफ काढून घ्या. पिझ्झा छान शिजेल.

Pizza Toppings | pinterest

चिली फ्लेक्स

त्यानंतर मका, पिझ्झा सॉस, पिझ्झा मसाला, चिली फ्लेक्स वरून टाका. लक्षात ठेवा यांचे प्रमाण अगदीच कमी असणे गरजेचे आहे.

Chili Flakes | pinterest

चीज

शेवटी तुम्हाला आवडत असेल तर किंचित चीज टाका नाहीतर नाही टाकले तरी चालेल. या पिझ्झामध्ये जास्त भाज्या असणे महत्त्वाचे आहे.

Cheese | pinterest

NEXT : ना गॅसची गरज ना जास्त वेळ, झटपट बनणाऱ्या 'या' ५ रेसिपी नाश्त्याला ट्राय करा

Quick Breakfast Recipes | pinterest
येथे क्लिक करा...