Quick Breakfast Recipes : ना गॅसची गरज ना जास्त वेळ, झटपट बनणाऱ्या 'या' ५ रेसिपी नाश्त्याला ट्राय करा

Shreya Maskar

सकाळचा नाश्ता

सकाळच्या घाईगडबडीत नाश्ता बनवायला वेळ नसेल तर अवघ्या ५ मिनिटांत बनणाऱ्या या रेसिपी एकदा ट्राय कराच. यासाठी तुम्हाला गॅसची गरज नाही. तसेच या पदार्थांमुळे तुम्हाला उत्साही देखील वाटेल.

Morning Breakfast | pinterest

सत्तू सरबत

उन्हाळ्यात सत्तू सरबत प्यायल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि पोटही भरेल. सत्तू सरबत बनवण्यासाठी एका ग्लासात सत्तू ,पाणी, मीठ, लिंबाच्या रस मिक्स करा आणि प्या.

Sattu Sherbet | pinterest

सँडविच

सँडविच हा झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार आहे. यात व्हेजिटेबल सँडविच, पीनट बटर सँडविच तुम्ही बनवू शकता. पीनट बटर सँडविचसाठी ब्रेडच्या एका स्लाइसवर पीनट बटर लावा, त्यावर केळ्याचे काही काप ठेवा आणि ब्रेड बंद करून सँडविचचा आस्वाद घ्या.

Sandwich | pinterest

फ्रूट योगर्ट

दही आणि फळे दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. फ्रूट योगर्ट बनवण्यासाठी बेरी किंवा द्राक्षे यांसारखी तुमची आवडती फळे दह्यामध्ये मिसळा आणि खा. फक्त दही जास्त आंबट नाही ना याची खात्री करा.

Fruit Yogurt | pinterest

फ्रूट चाट

सकाळी ताजी फळे हा उत्तम नाश्ता आहे. यामुळे शरीराला अनेक फायदे देखील होतात. तुमची आवडती फळे लहान तुकड्यांमध्ये कापून त्यावर काळे मीठ आणि चाट मसाला शिंपडा, अशाप्रकारे फ्रूट चाट तयार झाला.

Fruit Chaat | pinterest

स्प्राउट्स

स्प्राउट्स हा खूप हेल्दी नाश्त्याचा पर्याय आहे. स्प्राउट्स बनवण्यासाठी मूग, काळे हरभरे धुवा, तुमच्या आवडीचे इतर कडधान्य ओल्या कापड्यात गुंडाळून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्यावर काळे मीठ शिंपडा आणि खा. यामुळे तुमचे पोट भरते. स्प्राउट्स फायबरचा उत्तम पर्याय आहे.

Sprouts | pinterest

ओटमील

एका बाऊलमध्ये ओट्स, दूध एकत्र करा आणि याचा स्वाद घ्या. तुम्ही यात भरपूर सुकामेवा टाकू शकता. ज्याचा शरीराला खूप फायदा होतो.

Oatmeal | pinterest

फळांचा ज्यूस

तुम्हाला झटपट पण हेल्दी खायचे असेल तर फळांचा ज्यूस हा उत्तम पर्याय आहे. फक्त ५ मिनिटांत ज्यूस तयार होईल. तुम्ही यासाठी तुमच्या आवडीची फळे निवडा.

Fruit Juice | pinterest

NEXT : ॲसिडीटीमुळे हैराण झालात? रोज सकाळी प्या 'या' ३ पदार्थांपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक, पोट होईल साफ

Acidity | pinterest
येथे क्लिक करा...