Acidity : ॲसिडीटीमुळे हैराण झालात? रोज सकाळी प्या 'या' ३ पदार्थांपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक, पोट होईल साफ

Shreya Maskar

ॲसिडीटी

आम्लपित्त, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटीचे मूळ कारण चुकीचा आहार आहे. खूप गरम, मसालेदार- तिखट पदार्थ खाणे, जास्त आंबट पदार्थ खाणे आणि पचायला वेळ लागणारे पदार्थ खाणे ही देखील आम्लपित्ताची कारणे असू शकतात.

Acidity | pinterest

हेल्दी ड्रिंक

ॲसिडीटीवर रामबाण उपाय म्हणून तुम्ही रोज सकाळी ओव्याचे पाणी प्या. पण यात हे २ पदार्थ टाकायला विसरू नका. ओव्याचे ड्रिंक बनवण्यासाठी काचेच्या बरणीत पाणी ओता.

Healthy Drink | pinterest

बडीशेप

बरणीत जिरे (२ चमचे), धणे (१ चमचा), बडीशेप (१ चमचा) आणि ओवा (१ चमचा) एकत्र मिसळा आणि रात्रभर भिजत ठेवा.

Fennel Seeds | pinterest

सकाळी प्या

रिकाम्या पोटी सकाळी ओव्याचे पाणी प्या, यामुळे तुम्हाला ॲसिडीटीची समस्या भासणार नाही आणि तुमचे पोट देखील साफ होईल.

Drink in the Morning | pinterest

पचनक्रिया सुधारते

चयापचय क्रिया वाढवण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आम्लपित्त कमी करण्यासाठी जिरे आणि ओव्याचे पाणी रामबाण उपाय आहे.

Improves Digestion | pinterest

लिंबू

हे पेय दररोज पिण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, उरलेले मिश्रण रात्रभर उकळून ते अर्धे आटवणे. त्यानंतर ते चहाप्रमाणे प्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात किसलेले आले किंवा लिंबू घालू शकता.

lemon | yandex

मध

चहाची चव गोड करायची असल्यास तुम्ही यात अजमोद,मध किंवा गूळ घालू शकता. मात्र याचे प्रमाण योग्य असावे. अजमोदच्या बिया कोमट पाण्यासोबत चावून खाव्यात. यामुळे पचन चांगले होते.

Honey | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

disclaimer | pinterest

NEXT : रात्रीच्या जेवणाला बनवा कोकण स्पेशल 'वालाची झणझणीत उसळ', रेसिपीत 'हा' पदार्थ टाकायला विसरू नका

Valachi Usal Recipe | saam tv
येथे क्लिक करा...