Shreya Maskar
कोकणात लग्न असो वा घरात कोणती पूजा असो 'वालाची उसळ ' हा पदार्थ आवर्जून बनवला जातो आणि आवडीने खाल्ला देखील जातो. झटपट होणारी रेसिपी नोट करा.
वालाची उसळ बनवण्यासाठी अंकुरलेली वाल, कांदे, टोमॅटो, तेल, जिरे, मसाला (गोडा मसाला / गरम मसाला), हळद, कोथिंबीर आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाका. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा गोल्डन फ्राय करा. गॅस मंद आचेवर ठेवा.
आता मिश्रणात पाणी घालून एक उकळी काढून घ्या. त्यानंतर उसळमध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हळद, जिरे, गोडा मसाला , गरम मसाला, थोडा तिखट मसाला मिक्स करा.
शेवटी पुन्हा ५ मिनिटे भाजी चांगली शिजू द्या. त्यानंतर यात चवीनुसार मीठ आणि हिरवीगार कोथिंबीर घाला. अशाप्रकारे वालाची उसळ तयार झाली.
झणझणीत वालाची उसळ तुम्ही पुरी, पोळी, भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता. गरमागरम भातासोबत वालाची उसळ चवीला खूपच भारी लागते.
वालांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वारंवार भूक लागत नाही.