Sleep deprivation effects: ही ६ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नाही, ४ कारण हादरवणारं

Surabhi Jayashree Jagdish

झोप

जर तुम्हाला झोप पुरेशी मिळत नसेल, तर त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर, मेंदूवर आणि मनःस्थितीवर दिसू लागतो. अनेकांना हे बदल सुरुवातीला लक्षातही येत नाहीत. पण हळूहळू शरीर सतत थकलेलं वाटू लागतं आणि कामाची क्षमता कमी होते.

lack of sleep symptoms | saam tv

दिवसभर सतत थकवा जाणवणं

झोप कमी मिळाल्यास शरीराला पूर्ण विश्रांती मिळत नाही आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. सकाळी उठल्यानंतरही शरीर जड आणि सुस्त वाटू शकते.

insomnia problems | saam tv

लक्ष केंद्रित करण्यात अडचण

झोप मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी खूप महत्त्वाची असते आणि तिचा अभाव झाल्यास मेंदू नीट काम करत नाही. त्यामुळे साध्या गोष्टींवरही लक्ष लागणं कठीण होतं. स्मरणशक्ती कमी होणं आणि काम करताना गोंधळ होणं हेही दिसू लागतं.

fatigue and tiredness | saam tv

चिडचिड आणि मूड बदलणे

झोपेच्या कमतरतेमुळे मेंदूतील इमोशन्सचं नियंत्रण बिघडतं आणि त्यामुळे चिडचिड होते. लहान गोष्टींवरही जास्त राग किंवा त्रास जाणवू शकतो. सतत अस्थिर मनःस्थिती आणि तणाव वाढणं हेही सामान्य लक्षण आहे.

mood swings sleep loss | saam tv

जंक फूड खाण्याची इच्छा होणं

झोप कमी झाल्यावर शरीरातील भूक नियंत्रित करणारे हार्मोन्स असंतुलित होतात. त्यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा वाढते. विशेषतः गोड पदार्थ आणि जंक फूड खाण्याची इच्छा जास्त होते.

weak immunity sleep | saam tv

वारंवार आजारी पडणं

झोप ही रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक असते कारण त्याच वेळी शरीर दुरुस्तीचं काम करतं. झोप कमी असल्यास इम्युनिटी कमी होते आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सर्दी, खोकला किंवा इतर आजार वारंवार होऊ शकतात.

sleep and mental health | saam tv

अपघातांचा धोका वाढणे

झोपेच्या अभावामुळे मेंदूची प्रतिक्रिया देण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे निर्णय घेणं आणि जलद प्रतिक्रिया देणं कठीण होते. यामुळे दैनंदिन कामात चुका होण्याची आणि अपघात होण्याची शक्यता वाढते.

sleep disorder effects | saam tv

High Cholesterol: नसांमध्ये कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास पायांमध्ये दिसतात ही 4 मोठी लक्षणं

Blood Vessel Blockage | saam tv
येथे क्लिक करा