Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेच्या लोकलसेवेबाबत मोठी अपडेट आली आहे. मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची लोकलसेवा तब्बल ४० मिनिटे उशिराने सुरु आहे.

Vishal Gangurde

विकास काटे, ठाणे

Mumbai Local Train :

मध्य रेल्वेच्या लोकलसेवेबाबत मोठी अपडेट हाती आली आहे. मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची लोकलसेवा तब्बल ४० मिनिटे उशिराने सुरु आहे. या विस्कळीत लोकलसेवाचा प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे. लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची एकच चढाओढ पाहायला मिळत आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकलसेवा ४० मिनिटे उशिराने सुरु आहेत. लोकलसेवा विस्कळीत होताच ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. लोकलने घरी जाणाऱ्या प्रवाशांची प्रवास करण्यासाठी एकच चढाओढ पाहायला मिळत आहे. लोकल ट्रेन उशिराने असल्याने रेल्वेकडून कोणत्याही उद्घोषणा देण्यात येत नाहीये.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आज दुपारीपासून लोकल ट्रेन उशिराने सुरु आहेत. रेल्वेच्या वतीने कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, ही लोकलसेवा थोड्यावेळात सुरळीत होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कल्याणच्या बाजूने जाणाऱ्या लोकलसेवा उशिराने धावत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 : मुंबईमध्ये विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये मजुरांना घेऊन जाणारे वाहन पलटी, १२ जण जखमी

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Nanded : गणरायाच्या विसर्जनासाठी उतरले नदीत; पाय घसरल्याने तिघेजण गेले वाहून, एकाला वाचवण्यात यश

Viral Video: बापरे...जीवघेणा स्टंट! तरुणाने चक्क पाण्यात जाऊन मासे नाही तर मगरीला पकडले, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT