Eknath Shinde News: स्वच्छता अभियानात मुंबईला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा; CM शिंदे यांचे आवाहन

Eknath Shinde Latest News: देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर आहे. मात्र येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSaam tv
Published On

Eknath Shinde News:

मुंबईबद्दल जगभरात आकर्षण आहे. हे मुंबई महानगर स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त करायचे आहे. देशभरात महाराष्ट्र स्वच्छता अभियानात अग्रेसर आहे. मात्र येत्या काळात या अभियानात मुंबई देखील देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. (Latest Marathi News)

मुंबईतील संपूर्ण स्वच्छता मोहीमबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डीप क्लिन ड्राईव्हला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. या परिसरात स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे. ही मोहिम मुंबईच्या प्रत्येक गल्ली आणि रस्त्यापर्यंत पोहचायला हवी. प्रत्येक रस्ता, गल्लीसह सार्वजनिक शौचालये नियमितपणे स्वच्छ व्हायला हवी. या मोहिमेचा परिणाम मुंबईच्या अंतर्गत भागात दिसायला हवा'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Eknath Shinde News
Loksabha Election: देशात १६ एप्रिलला लोकसभा निवडणूक होणार? काय आहे निवडणूक आयोगाच्या पत्राचं सत्य?

'मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची गरज भागविण्यासाठी गरज भासल्यास बाहेरील संस्थांची मदत घ्यावी.स्वच्छतेसोबतच झाडे लावणे, हिरवाई तयार करणे, सुशोभिकरण याकडे लक्ष द्यावे. यासाठी तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ठिकाणांची निवड करावी. त्यानंतर त्यांच्यावर सुशोभिकरणाची जबाबदारी सोपवावी. महापालिकेची रुग्णालये, समुद्रकिनारे, मंडई, शाळांचे परिसर यांच्याही स्वच्छतेकडे लक्ष द्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढे सांगितले की,मुंबईत रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांना हटवून स्वच्छता करण्यासाठी पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी. तसेच मोहिम सुरु झाल्यापासून नागरिकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. मुंबईच्या बदलासाठी ही चांगली सुरुवात आहे. या मोहिमेत स्वच्छता कर्मचारी देखील उत्साहाने योगदान देत आहेत'.

Eknath Shinde News
Udhav Thackeray On BJP: भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना नाही, उद्धव ठाकरेंची भाजपवर नाशिकमधून चौफेर फटकेबाजी

'सर्व वसाहतींच्या विकासाची कामे तातडीने सुरु करावीत. स्वच्छता मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेच्या प्रत्येक वार्डातील सहाय्यक आयुक्तांनी थेट फिल्डवर उतरुन काम करावे. वार्डांमध्ये स्पर्धा ठेवून चांगले काम करणाऱ्या वॉर्डांना गौरवण्यात यावे. यामुळे मोहिमेत जास्तीत जास्त चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com