Udhav Thackeray On BJP: भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना नाही, उद्धव ठाकरेंची भाजपवर नाशिकमधून चौफेर फटकेबाजी

Udhav Thackeray On BJP News: भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना नाही. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेतून केला.
Udhav Thackeray On BJP
Udhav Thackeray On BJPSaam Digital
Published On

Udhav Thackeray On BJP

उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर राम मंदिर, शंकराचार्य आणि हिंदुत्वावरून नाशिकमधून चौफेर टीका केली. राम मंदिराची प्रतिष्ठापणा राम नवमीला करता आली असती मग एवढी घाई का केली असा सवाल करतानाच त्यांनी शंकराचार्य यांचं योगदान काय असं काही जण बोलतायेत. भाजपमध्ये आज भ्रष्टाचाऱ्यांना मान पण शंकराचार्यांना नाही. हा सनातन धर्माचा अपमान असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

राम मंदिर बनवण्यासाठी, ३०७ कलम हटवण्यासाठी भाजपला आम्ही पाठिंबा दिला.कठीण काळात शिवसेनेने तुम्हाला मदत केली. त्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपची नीती बरोबर नाही, मित्रपक्षाला संपवतात. यांना विरोध नको, मित्र पक्ष नको, पक्षातील नेत्यांची गरज नाही. शिवराज सिंग, वसुंधरा राजे, फडणीसांना बाजूला केलं. शिंदेना देखील फेकतील. त्यामुळे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांनी सुद्धा आता सांभाळून राहिलं पाहिजे,असा टोला त्यांनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका बाजूला कडेकोट बंदोबस्तात राहतात. माझ्या कडे पळणारे कार्यकर्ते नाहीत. शिवसेना माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. तो वारसा घेवून पुढे चाललोय. काल मला शिवसेना पक्ष प्रमुखांची आठवण आली, जनतेला पण आली असेलच. अयोध्येत प्रभू श्री रामाचा जन्म झाला पण नाशिक पंचवटी श्री रामाची पराक्रमाची भूमी आहे. शुर्फनखेचं नाक श्री रामांनी इथेच कापलं. १४ हजार राक्षसांचा वध इथेच रामाने केला.रामाने काल स्वरूप धारण करून त्यांचा वध केला म्हणून काळाराम हे नाव पडलं.

Udhav Thackeray On BJP
Sanjay Raut: 'मोदी फक्त दोघांनाच घाबरतात, शेतकरी अन् ठाकरे...' नाशिकच्या महासभेत राऊतांची फटकेबाजी

केवळ मतांसाठी महाराष्ट्रात दौरे

महाराष्ट्रातील मोंदीच्या दौऱ्यावरून ते म्हणाले,मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढलेत, पण मोदींनी एकदा महाराष्ट्र बघून घेतला पाहिजे. संकट काळात महाराष्ट्रात आले नाहीत. आता निवडणूक काळात महाराष्ट्र आठवतोय. मणिपूर ला २ जागा तिकडे गेले नाहीत. केवळ मतांसाठी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. मात्र हाच महाराष्ट्र यांना येणाऱ्या निवडणुकांमध्ये धडा शिकवणार आहे. महाराष्ट्राला मदत करत नाही, गुजरातला मात्र न मागता मदत केली जाते. देशासाठी मन की बात आणि गुजरात साठी धन की बात सुरू आहे. महाराष्ट्र ओरबाडत आहेत,लुटत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्र लुटला जातोय आणि हे दिल्लीसमोर लोटांगण घालतायेत, असा घटाघात त्यांनी शिंदेंवर केला.

२०१४ मध्येच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न

२०१४ साली भाजपने युती तोडली. त्यावेळी शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या. त्यावेळी मोदींनी अभिनंदन केलं.दिल्ली तुम्हाला घाबरायला लागलेय, असं म्हणत होते. २०१४ ला बाळासाहेब नव्हते त्यामुळे शिवसैनिक माझ्या सोबत येणार नाहीत, असं त्यांना वाटत होत.२०१४ मध्ये शिवसेना संपवण्याची यांची भाषा होती. अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर पाव मुख्यमंत्रीपद असणारे फडणवीस अडीच वर्षे पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. शिवसेना फोडली नसती, तर सर्व ताकद मागे उभी केली असती. सारखं महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसती.

राम नवमीच्या मुहूर्तावर निवडणुकांची तारीख

नरेंद्र मोदींच्या धार्मिकपणाबद्दल आपण काही म्हणत नाही, उपवास करा, पण देशातील कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घ्या.भाजपला मत मागायला रामाची गरज पडतेय. मग मोदींनी १० वर्षात केलं तरी काय असा सवाल करताना त्यांनी भाजप सरकार राम नवमीच्या आधी निवडणुकांची तारीख जाहीर करतील असा गौप्यस्फोट देखील केला

Udhav Thackeray On BJP
Maharashtra Politics: शाब्दिक पोपटपंची करून थांबेल, ती शिवसेना नव्हे; ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांना इशारा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com