Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता १५ डब्ब्यांच्या लोकल दुप्पट होणार

Central Railway: मध्य रेल्वेवरुन धावणाऱ्या १५ डब्ब्यांच्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या या लोकलच्या २२ फेऱ्या होत आहे. यानंतर ४४ फेऱ्या होतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Central Local Train: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर आता १५ डब्ब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची क्षमता वाढवणार आहे. आता यासाठी सीएसएमटीची जुनी इमार पाडण्यात येणार आहे. सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ च्या विस्तारासाठी अडचण असणारी जुनी रुट रिले इंटरलॉकिंग इमारत पाडली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहहे. कारण, १५ डब्ब्यांच्या एकूण ४४ लोकल मुख्य मार्गावर धावणार आहे. याआधी फक्त २२ फेऱ्या व्हायच्या.

मध्य रेल्वेने सीएसएमटी येथे सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा केली आहे. सिग्नलिंगचे सर्व कामकाज नवीन इमारतीत सिफ्ट करण्यात आले आहे.

सिंग्नलिंगची जुनी आरआरआय इमारत रिकामी झाली आहे. त्यामुळे ती पाडमार आहे. ही इमारत पाडल्यावर तब्बल ४०० चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्म ५ आणि ६ ची लांबी वाढवली जाणार आहे. यासाठी ११ कोटींपेक्षा जास्त खर्च येणार आहे.

या दोन्ही प्लॅटफॉर्मची लांबी सध्या २९० आहे तर ती आहे ३९० मीटर होणार आहे. या प्लॅटफॉर्मवरुन १५ डब्ब्यांच्या लोकल चालवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

१५ डब्ब्यांची लोकल उभी करण्यासाठी सानपाडा कारशेड आणि सीएसएमटी या दोनच जागा आहेत. त्यामुळे जास्त फेऱ्या होत नव्हत्या. मात्र, आता फ्लॅटफॉर्म ५ आणि ६ चे काम होणार आहे. त्याची लांबी वाढवणार आहे. यामुळे जास्त लोकल धावू शकणार आहे. यामुळे २२ ऐवजी ४४ फेऱ्या होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Schoking News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT