Central Railway News Saam Tv
मुंबई/पुणे

Railway News : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी, बॅगचे स्कॅन अन् स्टिकर लावूनच करता येणार प्रवास; नाहीतर...

Central Railway News : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवा निर्णय घेतला आहे. आता ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी प्रवाशांचे सामान बॅगेज स्कॅनरने तपासले जाईल आणि विशिष्ट स्टिकर लावण्यात येईल.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेने रेल्वे प्रवाशांसाठी नवीन सुरक्षा नियम लागू केला आहे

  • ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी बॅगेज स्कॅनरने सामान तपासले जाईल

  • सामानावर रेल्वेचा विशिष्ट स्टिकर लावणे अनिवार्य केले आहे

  • स्टिकर नसल्यास प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी मिळणार नाही

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसण्यापूर्वी आता सामानाला स्कॅनर करून त्याला स्टिकर लावण्यात येणार आहे. त्याशिवाय प्रवाशांना रेल्वेत बसण्याची परवानगी नसल्याचं मध्य रेल्वेने म्हटलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईतील प्रमुख टर्मिनस असून येथून दररोज शेकडो मैल व एक्स्प्रेस सुटतात. या स्थानकातून अनेक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने नवीन उपाययोजना लागू केली आहे. रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वी मेल-एक्सप्रेसच्या मुख्य प्रवेशद्वारांवर दोन बॅगेज स्कैनर बसवले आहेत.

यासोबतच लोकलच्या प्लॅटफॉर्मवरून आणि तिकीट काउंटरकडून एक्स्प्रेसच्या प्लॅटफॉर्मकडे जाणाऱ्या सर्व प्रवेशद्वारांवर बॅरिकेट्स लावून ते सुरक्षित करण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे बॅगची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळणार आहे.

शिवाय प्रवाशांच्या बॅगेवर रेल्वेचा विशिष्ट प्रकारचा एक स्टिकर लावण्यात येईल. ज्या प्रवाशांच्या बॅगेला हा स्टिकर नसेल त्यांना रेल्वेत बसता येणार नसल्याचं समोर आलं आहे. यामुळे रेल्वे परिसरातील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेला बळकटी मिळणार आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवास करण्यापूर्वी हे नियम पाळा अन्यथा प्रवास करता येणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

SCROLL FOR NEXT