Central Railway Saam Tv
मुंबई/पुणे

Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

Central Railway Badlapur-Karjat 3rd-4th Railway Line : आता मध्य रेल्वेचा प्रवास आणखी सुसाट होणार आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी दिली आहे.

Siddhi Hande

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

कल्याणच्या पुढचा प्रवास आता वेगवान होणार

बदलापूर कर्जतदरम्यान तिसऱ्या चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता मध्य रेल्वेवर कल्याणपुढील प्रवासदेखील वेगवान होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाअंतर्गत बदलापूर आणि कर्जदरम्यान तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी या प्रकल्पाला आर्थिक व्यव्हारांसंबंधित मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पाच्या अंबलबजावणीला हिरवा कंदील दाखवला आहे.

बदलापूर ते कर्जत स्थानकादरम्यान ३२,४६ किमी उपनगरीय रेल्वे विभागाचे चौपदीकरण केले जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळाअंतर्गत राबवण्यात येणार आहे. यामुळे कल्याणपुढील प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

या प्रवाशांना होणार फायदा

रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिकांमुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या स्थानकातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन मार्गिका आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या जर या मार्गिकांवरुन जात असेल तर इतर लोकलला थांबावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा खूप खोळंबा होतो. फक्त दोनच रेल्वे मार्गिका असल्याने जादा लोकल फेऱ्या चालवणेदेखील शक्य होत नाही. परंतु आता या रेल्वेच्या तिसऱ्या आणि चोथ्या मार्गाला मंजुरी दिल्याने प्रवाशांना खूप फायदा होणार आहे.

काम कधी होणार पूर्ण?

बदलापूर ते कर्जतदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सोपी होणार आहे. याचसोबत मालवाहतूकीलाही कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी काम लवकरच सुरु केले जाईल. भूसंपादन झाल्यानंतर ३-४ वर्षात काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाआधीच भाजपच्या खात्यात ४ था विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल|VIDEO

Hair Care: लांब घनदाट आणि शाईनी केस पाहिजेत? मग आजीने सांगितलेला हा नुस्खा नक्की करा ट्राय

महापालिका निवडणुकीत हलगर्जीपणा; 1200 कर्मचाऱ्यांना नोटिस|VIDEO

Blouse Designs: सिल्कच्या साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज प्रकार, तुम्हीही ट्राय करा

Maharashtra Live News Update: मुंबईतील भाजप उमेदवाराचा अर्ज रद्द करण्याची मागणी, अनधिकृत बांधकामाचा आरोप

SCROLL FOR NEXT