Manasvi Choudhary
रेल्वेने प्रवास करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक सवलत योजना आणली आहे.
रेल्वे अॅपच्या माध्यमातून तिकिटे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ३ टक्के सूट देण्यात येणार आहे. डिजिटल तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ही सवलत १४ जानेवारी ते १४ जुलै २०२६ या कालवधीत लागू राहणार असून यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
सध्या रेल वन अॅपवर - वॉलेट वापरून अनारक्षित तिकीट बुक केल्यास ३% कॅशबॅक दिला जातो ही योजना अद्याप तशीच सुरू राहणार आहे. ३% सवलत ही अॅपवर केलेल्या सर्व डिजिटल पेमेंट मोडसाठी असेल.
फक्त रेलवन अॅपवरच ही सवलत उपलब्ध असेल. कोणत्याही डिजीटल पेमेंट मोड द्वारे तिकीट खरेदी केल्यास थेट ३% सूट मिळणार आहे.
इतर कोणत्याही ऑनलाइन अनारक्षित तिकीट फ्लॅटफॉर्मवर ही योजना लागू होणार नाही.