Manasvi Choudhary
सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये 'AB फॉर्म' हा शब्द सतत कानी पडत आहे. मात्र तुम्हाला माहितीये का? 'AB फॉर्म' म्हणजे काय?
'AB फॉर्म' म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपल्या उमेदवाराला दिलेले अधिकृत संमतीपत्र असते.
हा फॉर्म राजकीय पक्षाच्या मुख्य नेत्याकडून किंवा अधिकृत व्यक्तीकडून दिला जातो.
या फॉर्ममध्ये पक्षाने निवडणुकीसाठी कोणत्या व्यक्तीला अधिकृतपणे उमेदवारी देण्याचे अधिकार दिले आहेत, त्याची माहिती असते.
हा फॉर्म प्रत्यक्ष उमेदवारासाठी असतो. यात त्या विशिष्ट उमेदवाराचे नाव असते, ज्याला पक्ष आपले अधिकृत चिन्ह वापरण्याची परवानगी देत आहे.
जर उमेदवाराकडे AB फॉर्म नसेल, तर तो पक्षाचे अधिकृत चिन्ह वापरू शकत नाही. अशा वेळी त्याला 'अपक्ष' म्हणून निवडणूक लढवावी लागते.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत हा फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागतो.