Railway Mega Block News Saam Tv
मुंबई/पुणे

Mega Block News : महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवेर ४ दिवस विशेष ट्रॅफिक ब्लॉक,लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्यावरही होणार परिणाम, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Central Railway Mega Block News : मध्य रेल्वेकडून उमरमाळी–आटगाव दरम्यान तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. २ ते ११ डिसेंबरदरम्यान दुपारी २.५५ ते ४.१० वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल.

Alisha Khedekar

  • मध्य रेल्वेचा ४ दिवस मेगा ब्लॉक

  • मेगा ब्लॉक दुपारी २.५५ ते ४.१० दरम्यान घेण्यात येणार

  • अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलले

  • रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेने काही तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक घोषित केला आहे. हा मेगा ब्लॉक २ डिसेंबर ते ३ डिसेंबर, ३ डिसेंबर ते ४ डिसेंबर, ९ डिसेंबर ते १० डिसेंबर आणि १० डिसेंबर ते ११ डिसेंबर असा असणार आहे. उमरमाळी आणि आटगांव स्थानकांदरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगा ब्लॉक दुपारी ०२.५५ ते ०४ : १० वाजेपर्यंत असणार आहे.

ब्लॉक का घेण्यात येणार ?

मध्य रेल्वेच्या खर्डी यार्डशी संबंधित २५ केव्ही एसी ओएचई (ओव्हरहेड इक्विपमेंट) कामासाठी उमरमाळी आणि आटगांव स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक ०२ डिसेंबर ते ३ डिसेंबर, ३ डिसेंबर ते ४ डिसेंबर, ९ डिसेंबर ते १० डिसेंबर आणि १० डिसेंबर ते ११ डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे.

ब्लॉकची वेळ

हा ब्लॉक दुपारी ०२.५५ पासून ते ०४.१० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. यादरम्यान अप आणि डाउन नॉर्थ-ईस्ट मार्गावर तानशेत ते खर्डी दरम्यान पॉवर ब्लॉक सेक्शन असणार आहे. तर अप आणि डाउन नॉर्थ-ईस्ट मार्ग उमरमाळी ते आटगांव दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक सेक्शन असणार आहे. या पॉवर ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर होणार असून त्यांना दुसऱ्या बाजूने वळवण्यात येणार आहेत.

लांबपल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक :-

  • 20104 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्सप्रेसला कसारा येथे दुपारी ०२.४५ ते ०४.१० वाजेपर्यंत नियमन केली जाईल.

  • 11002 बल्लारशहा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेसला कसारा येथे दुपारी ०३.२३ ते ०४.१५ वाजेपर्यंत नियमन केली जाईल.

  • 12174 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई–प्रतापगड एक्सप्रेस/ 22110 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – बल्लारशहा एक्सप्रेस, 12545 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – कर्मभूमी एक्सप्रेस, 12152 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – शालीमार अतिजलद एक्सप्रेस इगतपुरी येथे ०२.५५ ते ०३.३५ वाजेपर्यंत नियमन केल्या जातील.

  • 15101 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – छपरा एक्सप्रेस, 12361 आसनसोल – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस, 15547 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 15267 रक्सौल – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई एक्सप्रेस इगतपुरी येथे ०३.०५ ते ०३.४० वाजेपर्यंत नियमन केल्या जातील.

  • 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि 12106 गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस भुसावळ विभागात २० मिनिटे नियमन केल्या जातील.

पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी ब्लॉक्स

याशिवाय कसारा येथून ०३.५१ वाजता सुटणारी कसारा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरी गाडी उशीराने कसारा येथून ०४.२० वाजता सुटणार आहे. मेल/एक्सप्रेस गाड्या, विशेष गाड्या, उशिरा येणाऱ्या गाड्या किंवा नंतर जाहीर करण्यात येणाऱ्या गाड्या यांच्या वेळेत आवश्यकतेनुसार बदल केले जातील. हे ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

SCROLL FOR NEXT