Central Railway 14 special trains list 2025 : ख्रिसमस, हिवाळी सुट्ट्या, वर्षाअखेर यामुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे सुरू करण्याच्या मागणीने जोर धऱला होता. वाढती मागणी लक्षात घेता प्रवाशांना सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेने १४ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. या गाड्या मुंबई आणि पुण्यातून धावणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये प्रथम वातानुकूलित, वातानुकूलित द्वितीय, वातानुकूलित तृतीय, शयनयान आणि सामान्य द्वितीयसह सर्व वर्गांचा समावेश असेल, जे सर्व विभागातील प्रवाशांना सेवा देतील. याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात...
मध्य रेल्वेने विविध सण आणि हिवाळी सुट्ट्यांसाठी १४ विशेष ट्रेन ऑन डिमांड चालवण्याचे नियोजन केले आहे. प्रवाशांच्या फायद्यासाठी विविध ठिकाणांदरम्यान अनेक सेवांचे नियोजन केले आहे. या विशेष गाड्यांचे मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या विविध ठिकाणांचा यांत समावेश आहे. या गाड्यांतून जलद आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित केला जाईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी १२.१५ वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १७.१५ वाजता सुटेल.
पुणे ते बंगळुरू विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी पुणे येथून १९.०० वाजता सुटेल.
नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष गाडी दि. ६.१२.२०२५ रोजी नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १५.३० वाजता सुटेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ११.१० वाजता सुटेल.
लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद विशेष गाडी दि. ७.१२.२०५ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.२० वाजता सुटेल.
पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली) विशेष गाडी दि. ७.१२.२०२५ रोजी पुणे येथून २०.२० वाजता सुटेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.