Central Line Railway Station Name Saam Tv
मुंबई/पुणे

Central Line Railway Station Name: कर्जत ते CSMT दरम्यान नेमकी किती रेल्वेस्थानके? नावं तुम्हाला माहीत आहेत का? मग ही यादीच वाचा!

Manasvi Choudhary

रोज कामाच्या धावपळीत अनेकजण लोकल ट्रेनने प्रवास करतात. अनेकजण कर्जतपासून ते CSMT म्हणजेच मुंबई असा प्रवास करतात. आपण प्रवास करत असलेल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाची स्वतंत्र अशी ओळख आहे. ब्रिटीशकालापासून या रेल्वे स्थानकांना नावे देण्यात आली आहेत. अशातच कर्जत ते मुंबई (CSMT)प्रवासादरम्यान कोण कोणती स्थानके येतात याची सविस्तर माहिती घेऊया.

कर्जत ते मुंबई (CSMT) मार्गादरम्यान ३५ रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानक मार्गे तुम्ही मुंबईपर्यंतचा प्रवास करू शकतात. या मार्गावरून रेल्वे ही जलद व धिम्यागतीने धावतात.

कर्जत ते बदलापूर

कर्जत ते बदलापूर यादरम्यान प्रवास करताना कर्जतनंतरचे पहिले स्थानक भिवपुरी, नेरळ , शेलू , वांगणी यानंतर बदलापूर असे आहेत. या मार्गावरून रेल्वे जलद व स्लो पद्धतीने मार्गक्रमण करते.

बदलापूर ते कल्याण

बदलापूर ते कल्याण दरम्यान प्रवास करताना बदलापूरनंतरचे दुसरे स्थानक अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, कल्याण आहेत.

कल्याण ते ठाणे

कल्याण ते ठाणे दरम्यान प्रवास करताना कल्याणनंतरचे दुसरे स्थानक ठाकुर्ली, डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा, कळवा , ठाणे असे आहेत. कल्याणनंतर सात स्थानकानंतर ठाणे हे रेल्वेस्थानक आहे.

ठाणे ते कुर्ला

ठाणे ते कुर्ला दरम्यान प्रवास ठाणे रेल्वेस्थानक सोडल्यानंतर मुलूंड, नाहूर, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी , घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला अशी ८ रेल्वेस्थानके आहेत.

कुर्ला ते करीरोड

कुर्ला ते करीरोड मार्गे प्रवास करताना कुर्ला या रेल्वेस्थानकानंतर सायन, माटुंगा, दादर, परेल , करीरोड ही रेल्वेस्थानके आहेत.

करीरोड ते सीएसएमटी

करीरोड ते सीएसएमटी या मार्गे प्रवास करताना करीरोड या रेल्वेस्थानकानंतर चिंचपोकळी, भायखळा, सँडहर्स्ट रोड, मस्जिद, सीएसएमटी ही रेल्वेस्थानके आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT