उल्हासनगर मध्ये मुस्लिम तृतीयपंथीयाने केली गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना अजय दुधाने
मुंबई/पुणे

उल्हासनगर मध्ये मुस्लिम तृतीयपंथीयाने केली गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना

दरवर्षी आपण गणरायाची प्रतिष्ठापना करणार असल्याचं शमा शेख यांनी सांगितलं.

अजय दुधाने

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) जाती-धर्माच्या भिंती तोडत एका मुस्लिम (Muslim) धर्मीय तृतीयपंथीयाने घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. शमा शेख असं त्यांचं नाव असून त्यांचं सध्या उल्हासनगर मध्ये कौतुक होतं आहे. (Celebrate ganesh festival a Muslim third party in Ulhasnagar)

हे देखील पहा-

शमा शेख (Shama Sheikh) या मागील अनेक वर्षांपासून उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या (railway station )बाजूला असलेल्या परिसरात राहतात. मागील वर्षी शमा शेख यांना कोरोना (Corona) झाला होता. कोरोनामुळे त्यांची प्रकृती अतिशय बिकट बनली होती. यावेळी आपण कोरोनातून सुखरूप बाहेर पडल्यास घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू, असा नवस त्यांनी बाप्पाकडे मागितला होता. यानंतर बाप्पाच्या कृपेने त्या पूर्णपणे ठणठणीत बऱ्या होऊन घरी आल्या आणि यंदा त्यांनी आपला नवस पूर्ण करत घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली असल्यात सांगितल.

शमा शेख यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या शेजाऱ्यांनीही त्यांना सहकार्य करत त्यांच्या उत्सवात सहभाग घेतला. धर्माने मुस्लिम असूनही त्यांनी गणेशाची स्थापना केल्यानं आम्हाला त्यांचा अभिमान असल्याचं त्यांच्या शेजारी सांगतात. तर आपण आता दरवर्षी बाप्पाची प्रतिष्ठापना करणार असल्याचं शमा शेख यांनी सांगितलं. भक्तीला जाती-धर्माच्या भिंतींचं बंधन नसतं, हेच शमा शेख यांनी दाखवून दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT