Chhota Rajan News Saam Tv
मुंबई/पुणे

Chhota Rajan News: दत्ता सामंत हत्येप्रकरणी छोटा राजनची निर्दोष मुक्तता, 26 वर्षांनंतर निकाल

Datta Samant Murder Case: दत्ता सामंत हत्येप्रकरणी छोटा राजनची निर्दोष मुक्तता, 26 वर्षांनंतर निकाल

साम टिव्ही ब्युरो

Chhota Rajan News: कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येप्रकरणी गुंड छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआय कोर्टाने अनेक वर्षांनी छोटा राजनची निर्दोष मुक्तता केली. दत्ता सामंत यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले हे हायप्रोफाईल प्रकरण २६ वर्षे जुने आहे.

या हत्येत छोटा राजनचा पूर्ण सहभाग असल्याचा आरोप होता. सीबीआयने अनेक वर्षे या प्रकरणाचा तपास केला, पण आता ठोस पुरावे न मिळाल्याने छोटा राजनची सुटका करण्यात आली.

फिर्यादीनुसार, १६ जानेवारी १९९७ रोजी दत्ता सामंत हे पवईहून घाटकोपर येथील पंत नगरकडे जात होते. दरम्यान, पद्मावती रोडवरील नरेश जनरल स्टोअरजवळ त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. याच हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

सीबीआय कोर्टाने सांगितले की, राजेंद्र सदाशिव निकाळजे याने हा कट रचला हे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही. या निकालानंतरही या राजनची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता नाही. कारण त्याच्यावर विविध शहरांमध्ये डझनभर खटले सुरू आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, सामंत यांनी १९८१ मध्ये मुंबईत कापड गिरणी कामगारांचा संप पुकारला होता. सामंत यांची १६ जानेवारी १९९८ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, ते त्यांच्या जीपमधून घाटकोपर येथील पंत नगर येथील त्यांच्या कार्यालयाकडे जात होते.

दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी १७ राऊंड गोळीबार केला. राजनने हत्येचा कट रचल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे. परंतु विशेष न्यायाधीश ए एम पाटील यांनी शुक्रवारी निकाल देताना सांगितले की, राजनने कट रचल्याचे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 Live News: एकाच डावात १० विकेट्स घेणाऱ्या अंशूल कंबोजवर ३.४० कोटींची बोली

Assembly Election 2024: राज्यातील बडे नेते झाले काठावर पास; कोण विजयी अन् कोण पराभूत

Maharashtra News Live Updates: महायुतीत महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदासाठी बिहार पॅटर्नला नकार?

IPL Mega Auction: IPL लिलावात अन्कॅप्ड खेळाडूंचा बोलबाला ! या स्टार खेळाडूंवर लागली कोटींची बोली

Uddhav Thackeray : ते फडणवीस असले तरी आपण २० आहोत, पुरून उरू; उद्धव ठाकरेंनी पुन्हा वज्रमूठ आवळली!

SCROLL FOR NEXT