Maharashtra Political news : राज्यात पुन्हा राजकीय धुरळा उडणार; शरद पवारांसोबतच्या बैठकीत महाविकास आघाडीचा मोठा प्लान

Political News : देशातील विरोधकाची आघाडी 'इंडिया'ची पुढील बैठक मुंबईत पार पडणार आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSaam Tv

Mumbai News : राज्यातील राजकीय समीकरण बदलल्यानंतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीची ताकद कमी झाली आहे. मात्र तिन्ही पक्ष याही परिस्थितीत जनतेसमोर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्या दिशेने एक पाऊल पुढे म्हणून महाविकास आघाडी राज्यात लवकरच पुन्हा सभा घेणार आहे.

देशातील विरोधकाची आघाडी 'इंडिया'ची पुढील बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या सभांचं राज्यभरात ठिकठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे.

Mahavikas Aghadi
Maharashtra Politics : फेसबुकवर चालणारे नेते जनतेला नकोत; भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

या सभांना शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह काही ठिकाणी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे देखील हजेरी लावणार आहेत. 'इंडिया'ची बैठक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाल्यानंतर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज पार पडलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.  

राज्यातील महाविकास आघाडी मजबूत- नाना पटोले

बैठकीनंतर नाना पटोले यांनी म्हटलं की, राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे मविआच्या सभा थांबल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरु होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. (Latest Marathi News)

Mahavikas Aghadi
Nitin Gadkari News: पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी कंपन्या स्थापन करा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन

या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात ४-५ बैठका घेतलेल्या आहेत. तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असेही नाना पटोले म्हणाले. (Maharashtra Political Breaking News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com