Maharashtra Politics : फेसबुकवर चालणारे नेते जनतेला नकोत; भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule and Uddhav ThackeraySAAM TV

नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray Interview : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीवरून भाजपनं त्यांच्यावर नेम साधला आहे. जनतेला फेसबुकवर चालणारे नेते नकोत, तर रस्त्यावर फिरणारे नेते हवेत, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. खोटे बोल, पण रेटून बोल. संपादक तेच आणि मुलाखत देणारेही तेच. त्यांना जनतेमध्ये जायचे की घरात पक्ष चालवायचा आहे? त्यांना फिरण्याची सवय नाही. घरी चमचाने दूध पिऊन मोठे झाले आहेत. जनतेला फेसबुकवर चालणारे नेते नकोत. तर रस्त्यावर फिरणारे नेते हवे आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. (Maharashtra Political Breaking News)

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Cm Eknath Shinde: मुंबई - नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या; वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा, मुख्यमंत्री शिंदे यांचे अधिकाऱ्यांना आदेश

३ कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे टार्गेट

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आमचे अभियान सुरू आहे. नऊ वर्षांत मोदींनी खूप कामे केली आहेत. ती जनतेसमोर घेऊन जाणे, त्यांच्यासमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र सरकारच्या योजनाही घेऊन आम्ही घरोघरी जात आहोत. मोठे समर्थन मिळत आहे. राज्यात तीन कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे.'

बावनकुळे काय म्हणाले?

विरोधकांच्या बैठकीवरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले. विरोधकांना बैठक घेण्याचा अधिकार आहे. मी त्यावर काही जास्त बोलणार नाही, असे ते म्हणाले. संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी केलेल्या विधानावर काय करायचे ते सरकार बघून घेईल. भिडे स्वतंत्र आहेत. पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. सरकारने त्यांचे वक्तव्य तपासून त्यावर कारवाई करावी, असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule and Uddhav Thackeray
Maharashtra Politics: अजित पवारांनी जे पाऊल उचललंय त्याचेही स्वागत करावं, रोहित-अजित पवार भेटीवर प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र सरकार जनतेच्या हिताचे निर्णय मोठ्या प्रमाणात घेत आहे. विरोधक सभागृहात काही बोलताना दिसत नाहीत. त्यांच्यात संशयाचे वातावरण आहे. विरोधक एकमेकांकडे संशयाने बघतात. विरोधकांची वज्रमूठ सैल झाली आहे. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशा नव्या घडामोडी घडतील. २०२४ पर्यंत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार नाही, असं टीकास्त्रही त्यांनी सोडलं. शेतीच्या नुकसानीबाबतही त्यांनी मत मांडले. ज्या ठिकाणी पेरणीची गरज आहे. त्याठिकाणी सरकारने मदत केलीच पाहिजे. दोन्ही परिस्थितीत सरकारकडे मागणी करून मदत मागायला हवी, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com