Crime Saam Tv News
मुंबई/पुणे

Panvel: प्राचार्याकडून जातीवाचक शिवीगाळ अन्.., विद्यार्थ्यानं बेल्टनं घेतला गळफास; नवी मुंबईत खळबळ

Mental Harrasment to Sudent: प्राचार्याकडून होणाऱ्या शिवीगाळी आणि मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने वसतीगृहातील खोलीत कमरपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही संतापजनक घटना पनवेलमधून उघडकीस आली.

Bhagyashree Kamble

महाविद्यालयातील प्राचार्याकडून होणाऱ्या शिवीगाळ आणि त्रासाला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पनवेल तालुक्यातील पोयंगे गावातील एका खासगी महाविद्यालयातून उघडकीस झाली. वसतीगृहातील खोलीत कमरपट्ट्याने खिडकीच्या गजाला गळफास घेऊन त्यानं आयुष्य संपवलं. या प्रकरणी मृत तरूणाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत प्राचार्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अद्याप कोणतीही अटक झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत तरूण हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून, तो पनवेल येथील पोयंगे गावातील एका खासगी महाविद्यालयात बीएससी नर्सिंगचं शिक्षण घेत होता. मृत विद्यार्थ्याच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून प्राचार्याकडून विद्यार्थ्यावर जातीवाचक शिवीगाळ केली जात होती. तसेच इतरांसमोर अपमान केला जात होता. याच मानसिक छळाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्राचार्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३५२ (१) तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचिच जमाती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही', असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

या घटनेसंदर्भात पोलीस अधिकारी म्हणाले, 'आम्ही या घटनेसंदर्भात अधिक तपास करीत आहोत. साक्षीदार आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तसेच सर्व आवश्यक पुरावे गोळा केले जात आहे', अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती आणि ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा मुख्य सूत्रधाराच्या आवळल्या मुसक्या|VIDEO

Sangmeshwar Amba Ghat : संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर दरड कोसळली, वाहतूक पूर्णत: ठप्प; कोकणात जाणाऱ्यांचे हाल

Viral Video: आधी कानाखाली मारली नंतर उचलून आपटल; उधारीवरून ग्राहक अन् दुकानदाराचं भांडण पेटलं, Video व्हायरल

Maharashtra Live Update: पुण्यातील बॉलर पबवर गुन्हा दाखल

Raj Kundra Video: "माझी एक किडनी तुमच्या नावावर..."; शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचं वचन, प्रेमानंद महाराज भावुक

SCROLL FOR NEXT