
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेत्या आणि पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला शुभम नवले या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टला मोठा प्रतिसाद मिळतो आणि त्यांचा राज्यात मोठा चाहतावर्ग आहे. दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी त्या आपल्या पोस्टच्या माध्यमातून शेअर करत असतात. त्यांनी नुकतंच वट पौर्णिमेनिमित्त एक खास व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये शेअर केला आहे.
वटपौर्णिमा साजरी करत असताना व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या पोस्टवर सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून वटपौर्णिमेनिमित्त नेटकऱ्यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत.
निर्मला नवले यांनी खास वट पौर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओला त्यांनी, 'वटपौर्णिमेच्या पवित्र सणानिमित्त आपली नाती वटवृक्षाप्रमाणे अधिक बळकट व्हावी, अशी प्रार्थना', असं कॅप्शन देत त्यांनी शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये निर्मला यांनी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. घराच्या बाहेर असलेल्या वडाच्या झाडाचे पुजन करून त्यांनी प्रदक्षिणा घातल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
निर्मला नवले या पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच आहेत. त्या सोशल मीडियावर सक्रीय असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे ५१४ k फॉलोअर्स आहेत. विविध पोस्ट त्या शेअर करत असतात.
निर्मला यांच्यावर सध्या वर्किंग प्रेसिडेंट एनसीपी युवतीची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राजकारणात काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.