Mahayuti: गद्दारी करून गुवाहाटीला का गेला..? भाजप नेत्यानं प्रश्न विचारत देसाईंना डिवचलं

Satyajeet Patankar on Shambhuraj Desai: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाला सोडचिठ्ठी देत पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर टीकास्त्र डागलं.
Shambhuraj desai
Shambhuraj desaiSaam
Published On

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाला सोडचिठ्ठी देत पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर त्यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत आपल्या राजकीय प्रवासाची नव्याने सुरुवात केल्याचे स्पष्ट केलं. तसेच पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून करण्यात येणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना पाटणकरांनी थेट देसाई यांच्यावर निशाणा साधला.

पक्षप्रवेशावरून शंभूराज देसाई गटाकडून सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर वारंवार टीकास्त्र डागण्यात येत होतं. भाजपात पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांनी शंभूराज देसाई यांना थेट प्रश्न उपस्थित करत निशाणा साधला. 'आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. पण तुम्ही गुवाहाटी आणि सुरतला पळून जाण्याचं कारण काय?' असा रोखठोक सवाल त्यांनी शंभूराज देसाई यांना केला. या टीकास्त्रानंतर पाटणमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद समोर आला आहे.

Shambhuraj desai
Nirmala Nawale: पुण्यातील 'या' महिला सरपंचाच्या अदांवर अख्खा महाराष्ट्र फिदा, वटपौर्णिमेनिमित्त खास VIDEO केला शेअर; सोज्वळ लूक अन् बरंच काही...

सत्यजित पाटणकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर शंभूराज देसाई नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पाटणचे आमदार आणि पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी यासंदर्भात, 'आम्ही बोलणं योग्य नाही, आम्ही आमचं काम करीत आहोत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना, महायुती म्हणून आम्ही सगळीकडे काम केलं आहे. मंत्री म्हणून ज्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या, त्या पूर्ण केल्या', असंही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

Shambhuraj desai
Mumbai Local: तिकीट तेच सगळ्या लोकल AC, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या लाईफलाईनचा मास्टरप्लान

तसेच, त्यांनी पाटणकर यांचं नाव न घेता स्पष्ट केलं की, 'आपल्या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील एका नेत्याचा भाजपात प्रवेश झाला आहे. याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देणार आहे. त्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com