Pune : ATM चा स्फोट करून केली रोकड लंपास
Pune : ATM चा स्फोट करून केली रोकड लंपास  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune : ATM चा स्फोट करून केली रोकड लंपास

रोहिदास गाडगे

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) दरोडेखोरांनी स्फोट घडवून एटीएमवर दरोडा (Robbery) टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण औद्योगिक परिसरात (Chakan Industrial Area) चिंबळी आळंदी रोडवर ही घटना घडली आहे. चिंबळी येथील अँक्सेस बँकेच्या एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे.

चाकण (Chakan) MIDC परिसरातील चिंबळी- आळंदी (Alandi) या भर रहदारीच्या रस्त्यावरच असलेले AXIS बँकेचे हे एटीएम (ATM) दरोडेखोरांनी लुटले आहे. काल मध्यरात्रीनंतर ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे एटीएम मधील रोकड लुटण्याकरिता चोरांनी चक्क स्फोट (Explosion) घडवून आणला आणि स्फोट एवढा भीषण होता की एटीएम मशीन चक्काचूर झाले आहे.

हे देखील पहा-

फुटलेल्या एटीएम मशीनचे तुकडे काही अंतरावर फेकले गेल्याचे समजत आहे. गेल्या वर्षभरात ही तिसरी घटना असल्याने, महिलांवर अत्याचार (atrocity), दिवसाढवळ्या खून आणि एटीएम लुटण्याकरिता गुन्हेगारकडून केले जात असलेला स्फोटकांचा वापर बघता आता मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुणे (Pune) जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखली जात आहे का नाही असा प्रश्न उभा राहिला आहे.

दरम्यान या घटनेमध्ये फोडण्यात आलेल्या एटीएम मध्ये किती रक्कम होती हे अद्याप कळू शकले नाही. त्याच बरोबर एटीएम फोडण्याकरिता गुन्हेगारांनी कोणते स्फोटक वापरले याची माहिती समोर आली नसल्यामुळे पोलिसांच्या (police) तपासाकडे सर्वांचे लक्ष वेधून लागले आहे. घटनास्थळी पोलीस पोचले असून BDDS बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शक्तीप्रदर्शन

Pravin Darekar On Amol Kolhe | अमोल कोल्हेंबाबत मोठा गौप्यस्फोट!

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

Kalyan Lok Sabha | उमेदवारीचा गोंधळ, वैशाली दरेकरांची पहिली प्रतिक्रिया!

Money Tips: पैसे उजव्या हाताने का देतात? कारण वाचा

SCROLL FOR NEXT