बाबो! या गोष्टीसाठी गर्लफ्रेन्डनं केलं बॉयफ्रेंडला 'किडनॅप', कारण वाचाल तर थक्क व्हाल

एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्याकरिता जे केले आहे ते वाचून तुम्ही हैराण होणार
बाबो! या गोष्टीसाठी गर्लफ्रेन्डनं केलं बॉयफ्रेंडला 'किडनॅप', कारण वाचाल तर थक्क व्हाल
बाबो! या गोष्टीसाठी गर्लफ्रेन्डनं केलं बॉयफ्रेंडला 'किडनॅप', कारण वाचाल तर थक्क व्हाल Saam Tv

वृत्तसंस्था : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये रोमान्स होणे ही सामान्य बाब आहे. पण एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्याकरिता जे केले आहे ते वाचून तुम्ही हैराण होणार आहेत. एका गर्लफ्रेन्डने रोमान्स करण्याकरिता चक्क आपल्या बॉयफ्रेन्डला किडनॅप केले आहे. याचे कारण देखील तेवढंच भयानक आहे. एका अमेरिकन तरूणाने स्वत: त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेचा खुलासा केला आहे.

केन नावाच्या तरूणाने सांगितले की, एका रात्री तो जागा झाला तेव्हा त्याला दिसलं की, त्याला दोराने बांधले आहे. त्याला अजिबात अंदाज नव्हता की, त्या रात्री त्याच्याबरोबर असे होणार आहे. पण तरूणाच्या गर्लफ्रेन्डने एकदा त्याला सांगितले होते की, तिला किडनॅपर रोलमध्ये रोमान्स करायचा आहे. ज्या रात्री ही घटना घडली त्या रात्री केन घरी एकटा होता. गर्लफ्रेन्डने त्याला अगोदरच सांगितले होते की, ती एका ठिकाणी फिरायला जाणार आहे. मग तो त्या दिवशी गर्लफ्रेन्डसोबत चॅट (Chat) करत तो झोपला.

हे देखील पहा-

झोप उघडली तेव्हा तो त्याच्या बेडरूमच्या बेडवर बांधलेल्या अवस्थेत होता. त्याने सांगितले की, गर्लफ्रेन्डने असे काही करण्याविषयी इशारा दिला नव्हता. केनने उठण्याचा प्रयत्न केला, पण तो उठू शकत नव्हता. कारण त्याचे हात बेडला (bed) बांधले होते. समोर एक तरूणी उभी होती. थोड्या वेळाने त्याला अंदाज लागला की, ती तरूणी दुसरी कुणी नाही तर त्याची गर्लफ्रेन्डच आहे. केनने हेही सांगितले आहे की, आता या गर्लफ्रेन्डबरोबर त्याचे ब्रेकअप (Breakup) झाले आहे.

बाबो! या गोष्टीसाठी गर्लफ्रेन्डनं केलं बॉयफ्रेंडला 'किडनॅप', कारण वाचाल तर थक्क व्हाल
हार्दिक पांड्याच्या घरी पुन्हा एकदा 'हलणार पाळणा'; लवकरच चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

घटनेच्या अगोदर त्याच्या गर्लफ्रेन्डने अशा काही फॅंटसीविषयी चर्चा केली होती. गर्लफ्रेन्डची इच्छा होती की, डेलीस्टारच्या माहितीनुसार, जेव्हा केनला समजले की, गर्लफ्रेन्डनेच त्याला किडनॅप केले आहे. तेव्हा तो हैराण झाला होता. पण त्याने विरोध केला नाही. केन म्हणाला की, साधारण अडीच ३ तासांपर्यंत तो त्याच अवस्थेत पडला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com