Navale Bridge Accident Saam TV
मुंबई/पुणे

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळील अपघातप्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल

ट्रक चालकाच्या गाडीचा ब्रेक फेल असल्याने त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले

साम न्यूज नेटवर्क

Navale Bridge Accident: नवले पुल हा नेहमीच अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास पुलावर एक भीषण अपघात घडला. यात एका ट्र्कने सरसकट २४ वाहनांना चिरडून त्यांचा चक्काचूर केला. यात दुचाकी, रिक्षा, चारचाकी अशा वाहनांचा समावेश आहे. नवले पुलावर झालेल्या भीषण अपघातात ८ ते १० जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. यातच आता नवीन माहिती समोर आली आहे; असे म्हटले जात आहे की, यामध्ये ट्रक चालकाची चूक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनीलाल यादव असे ट्रक (Truck) चालकाचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तो सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ट्रक चालकाच्या गाडीचा ब्रेक फेल असल्याने त्याचे ट्रक वरील नियंत्रण सुटले त्यामुळे हा भीषण अपघात झाल्याची प्रथमीक माहिती मिळाली आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या घटनेची दखल घेत अपघात कुणामुळे झाला याचा शोध घ्या, तसेच अपघातात जखमी व्यक्तींना तात्काळ योग्य ते उपचार पुरवावेत अशा सुचना केल्या होत्या. नवले पुलावर अपघात घडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे इतर वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.

दोन तासांत एकापाठोपाठ तीन अपघात

नवले पुलावर अपघात झाल्यानंतर चक्काचूर झालेल्या सर्वच गाड्या रस्त्याच्या कडेने लावणे सुरू होते. यावेळी आणखीन दोन अपघात घडले. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिरासमोर नवले पुलावरील अपघाताप्रमाणेच घटना घडली. यात एका कंटेनरने दोन चारचाकी गाड्यांना धडक दिली. त्यानंतर रात्री सव्वा दहाच्या सुमारास कात्रज नवीन बोगदा ते दरी पुल परिसरात आणखीन एक अपघात घडला. यात चार चाकीची दुचाकीला जोरदार धडक बसली. या घटनेत दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT