Gajanan Marne Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल

प्रथमेशवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे - कुख्यात गुंड गजानन मारणेचा (Gajanan Marne) मुलगा प्रथमेश मारणे याच्यावर पुण्यात (Pune) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेशवर सिंहगड रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश मारणे आणि पीडित तरुणी गेल्या अडीच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान आरोपीने तरुणीला २७ ऑगस्ट २०२० ते १७ मार्च २०२२ दरम्यान वेगवेगळ्या लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले.

हे देखील पहा -

त्यावेळी आरोपीने काही व्हिडिओ तयार केले होते. तसेच पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचेही या तक्रारीत सांगण्यात आले आहे. पीडित तरुणीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तिला धमक्या दिल्या. पीडित तरुणीने सर्व घटनाक्रम सांगितल्यानंतर आरोपी प्रथमेश गजानन मारणे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सिंहगड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT