Mulund News
Mulund News  Saam TV
मुंबई/पुणे

Mulund Marathi Women Video : मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या पिता-पुत्रांवर गुन्हा दाखल; मुलुंड पोलिसांची कारवाई

विलास काटे

Mumbai News :

मुलुंडमध्ये मराठी महिलेला घर नाकारणाऱ्या गुजराती पिता-पुत्रांवर अखेर मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तृप्ती देवरुखकर यांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

प्रविण ठक्कर आणि त्यांचा मुलगा निलेश ठक्कर या दोघांनी तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याने घर भाड्याने देण्यास नकार दिला होता. याबाबत सोशल मीडियावर त्यानी व्हिडीओ टाकला आणि तो प्रचंड व्हायरल झाला. (Latest Marathi News)

या प्रकरणी मनसे मुलुंड विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण यानी सदर महिलेशी संपर्क केला. तेव्हा तृप्ती देवरुखकर यांनी रात्री उशिरा मुलुंड पोलीस ठाण्यात कलम ३४१, ३२३, ५०४ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुलुंड पोलिसांनी यातील दोन्ही आरोपींना रात्री ताब्यात घेतले आहे. (Mumbai NEws)

नेमकं काय घडलं?

तृप्ती देवरुखकर या आपल्या पतीसह मुंबईतील मुलुंड पश्चिममध्ये ऑफिस भाड्याने घेण्यासाठी गेल्या होत्या. तेथे एका सोसायटीमध्ये त्या ऑफिस पाहण्यासाठी गेल्या असता तिथे त्या मराठी असल्याने त्यांना ऑफिस मिळणार नाही असं त्या सोसायटीच्या सेक्रेटरीने सांगितलं.

मात्र याबाबत तृप्ती यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरण्यात आली. आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत तृप्ती यांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. यावेळी त्यांना मराठी माणसांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्याला सर्वच राजकीय पक्षांना फटकारलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shashank Ketkar Video: कार्यकर्त्यांचे फोटो बघण्यात इंटरेस्ट नाही...घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेवरुन अभिनेता शशांक केतकर भडकला

Jalgaon News: जामनेरमध्ये SRPF जवानाने गोळी झाडून स्वत:ला संपवलं; घटनेनं परिसरात खळबळ

T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला

Beauty Skin : महागड्या पावडर शिवाय गावच्या मुली नक्षत्रासारख्या सुंदर कशा दिसतात? वाचा सौंदर्याचं रहस्य

Olive Ridley Turtle Conservation: कोकणात कासव संवर्धन मोहिमेला तापमानवाढीचा फटका, 50 टक्के पिल्लांची संख्या घटली

SCROLL FOR NEXT