Pune News In Marathi Saam TV
मुंबई/पुणे

पुण्यातील 'त्या' कामगारांच्या मृत्यू प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल

गोपाल मोटघरे

पुणे: काल पुण्यातील लोणी काळभोरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. कदम वाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत लोणी स्टेशन परीसरात एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करत असताना, टाकीमध्ये गुदमरुन चौघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घडली आहे. मृत्यू झालेल्यात टाकी साफ करण्याकरिता उतरलेल्या 3 कामगारांचा (workers Death) तर त्यांना वाचविण्यासाठी धावलेल्या एका नागरीकांचा समावेश होता.

काल झालेल्या जय मल्हार बिल्डिंगचे मालक भिमाजी जयशिंग काळभोर यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. काल जय मल्हार बिल्डिंगमध्ये शौचालयाची टाकी साफ करत असताना चार कामगारांचा टाकितील विषारी वायूमुळे गुदमरुण मृत्यू झाला होता.

दरम्यान दुर्देवी घटना काल सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेमुळे लोणी काळभोरसह कदमवाकवस्ती परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेत सिकंदर उर्फ दादा पोपट कसबे (वय -४५) रा.पाण्याची टाकी संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, पद्माकर मारुती वाघमारे (वय-४३, पठारे वस्ती), कृष्णा दत्ता जाधव (वय- २६ रा. देशमुख वस्ती, देगाव, ता. उत्तर सोलापूर), रुपचंद उर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे, (वय- ४५, रा. सध्या घोरपडे वस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मुळ गाव केळेवाडी ता. वाशी जि. उस्मानाबाद) या चौघांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस (Police) आणि वाघोली फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी वेगवान हालचाली करत चारही जनांचे मृतदेह टाकीतुन बाहेर काढले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : सूरजाचा तो एक प्रश्न निक्कीला टाकतो कोड्यात, म्हणाली...

Nitin Gadkari : नवीन तंत्रज्ञानाने १० वर्षांत रस्त्यांवर एकही खड्डा पडणार नाही...; गडकरींची भर कार्यक्रमात गॅरंटी

Uday Samant News: पायलटचा टेक ऑफला नकार, उदय सामंतांना करावा लागला कारने प्रवास, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics : वर्षा बंगल्यावर मध्यरात्री खलबतं, विधानसभेसाठी महायुतीचा गेम प्लॅन ठरला; मुंबईत काय घडलं?

Chandrapur News: चंद्रपुरमधील शाळा अदानींच्या ताब्यात! राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ दिवसात व्यवस्थापन बदलण्याचे निर्देश

SCROLL FOR NEXT