Dhananjay Munde vs Karuna Munde Saam TV
मुंबई/पुणे

Karuna Munde : आमदार धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा; करुणा मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Satish Daud

रुपाली बडवे, साम टीव्ही

Dhananjay Munde vs Karuna Munde : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर बनावट व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे. इतकंच नाही तर धनंजय मुंडे यांचे किती मुलींसोबत संबंध आहे, याचा मी लवकर पर्दाफाश करणार आहे, असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

करुणा मुंडेंनी पत्रात काय म्हटलं?

"धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आजपर्यंत मला फसवण्यासाठी किती प्रयत्न केले. पोलिसांसमोर गाडीत रिवॉव्हर ठेवले. मला माझ्या मुलांपासून सहा महिने दूरही ठेवले. माझ्यावरती जीवघेणे हल्ले झाले, सहा खोट्या केसेस केल्या. षडयंत्र रचण्यासाठी वेगवेगळे लोक पाठवून माझी आर्थिक फसवणूक केली. तरीही मी हरली नाही, माझी त्यांच्यासोबतची लढाई अद्यापही सुरूच आहे", असं करूणा मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर माझे बनावट व्हिडीओ व्हायरल केले. आता रोज मला धमक्या दिल्या जात आहे. मानसिक त्रात दिल्या जातोय. त्यामुळे मी माझ्या स्वखर्चाने धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करण्याची विनंती करत आहे. धनंजय मुंडे आणि मी किती खरी आणि किती खोटे आहोत, याचे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल", असंही करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी म्हटलं आहे.

"मी ज्या ज्या मुलींचे नावे सांगेन त्या त्या मुलींसोबत धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत. त्याचा पण पर्दाफाश होईल. या सगळ्या गोष्टींची तक्रार मी DGP, मुख्यमंत्री आणि महिला आयोगाकडे केली आहे. मात्र, आतापर्यंत त्यावर काहीच कारवाई झाली नाही", असा आरोपही करुणा मुंडे यांनी केला आहे. (Maharashtra Political News)

धनंजय मुंडेंची तक्रार देऊनही महिला आयोगाने कारवाई न केल्याने रुपाली चाकणकरांना पदावरून हटवा, अशी मागणी सुद्धा आपण राष्ट्रीय महिला आयोगाकडे करणार आहे. धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल न झाल्यास आणि रुपाली चाकणकरांना काढून न टाकल्यास मंत्रालयासमोर उपोषणाला बसू, असा इशाराही करुणा मुंडे यांनी दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT