Sanjay Raut News : जीवे मारण्याच्या धमकीनंतर संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ; 'या' जिल्ह्यातील पोलिसांनी दिली सुरक्षा

Sanjay Raut Gets Police Protection: जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Saam Tv
Published On

तबरेज शेख

Nashik News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. जीवे मारण्याच्या धमकीनंतर खासदार संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना नाशिक पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. (Latest Marathi News)

संजय राऊतांच्या जीवे मारण्याच्या धमकीनंतर त्यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी पत्रात श्रीकांत शिंदेंनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राज ठाकूरला सुपारी दिली असा आरोप केला होता.

दरम्यान, संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान संजय राऊत यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ केली आहे. नाशिक पोलिसांनी संजय राऊत यांना पोलीस सुरक्षा दिली आहे. संजय राऊत यांच्या पत्रानंतर गृहविभागाकडून दखल घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

Sanjay Raut News
Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, गृहमंत्रालयाची CBI चौकशीला मंजुरी

काल पासून संजय राऊत हे नाशिकमध्ये (Nashik) आले आहेत. तर आज राऊत हे सिन्नरकडे जाणार आहे. दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांना धमकी मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांचं एक पथक नाशिकमध्ये दाखल झालं आहे. ठाणे पोलिसांनी संजय राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे.

Sanjay Raut News
Sanjay Raut News: '…नाहीतर रस्त्यावर ‘पवार…पवार’ ओरडत फिरण्याची वेळ येईल'; संदीप देशपांडेंनी पत्र लिहून राऊतांना डिवचलं

ठाणे एसीपी हे संजय राऊत यांचा जवाब घेत आहेत. काल त्यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. राऊतांच्या आरोपानंतर ठाणे पोलिसांकडून राऊत यांचा जवाब घेण्याचे काम सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या ६ जणांचे पथक नाशिकच्या 'एक्स्प्रेस इन' हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com