Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ, गृहमंत्रालयाची CBI चौकशीला मंजुरी

दिल्लीतीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता
Manish Sisodia
Manish SisodiaSaam Tv
Published On

Delhi Manish Sisodia News : दिल्लीतीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात. सीबीआयने दिल्ली सरकारच्या 'फीडबॅक युनिट'वर हेरगिरीचा आरोप करत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची परवानगी मागितली होती.

अखेर गृह मंत्रालयाने सीबीआयला मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याचे आणि फीडबॅक युनिटद्वारे हेरगिरीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Manish Sisodia
Ahmednagar News : कॉपी पुरवण्यासाठी उकळले पैसे, झालं भलतंच; एजंटला विद्यार्थी अन् पालकांनी चोपलं

काय प्रकरण आहे?

दिल्ली (Delhi) सरकारने 2015 मध्ये फीड बॅक युनिट (FBU) ची स्थापना केली होती. त्यानंतर त्यात 20 अधिकाऱ्यांसोबत काम सुरू केले. फेब्रुवारी 2016 ते सप्टेंबर 2016 या कालावधीत फीड बॅक युनिटने राजकीय विरोधकांची हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

युनिटने केवळ भाजपवरच नव्हे तर आपशी संबंधित नेत्यांवरही लक्ष ठेवले होते. एवढेच नाही तर युनिटसाठी एलजीकडून कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही असा देखील आरोप करण्यात आला आहे.

सीबीआयने (CBI) 12 जानेवारी 2023 रोजी गुप्तचर विभागाला एक अहवाल सादर केला आणि भ्रष्टाचार प्रकरणी मनीष सिसोदिया आणि इतर अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी एलजीकडे केली. त्याला लेफ्टनंट गव्हर्नर विनय सक्सेना यांनी मंजुरी दिली. आता या प्रकरणी सीबीआयला गृह मंत्रालयाकडून गुन्हा नोंदवून तपास करण्याची परवानगी मिळाली आहे.

Manish Sisodia
Kalyan Fire News : समर्थ नगर परिसरातील माेबाईल टाॅवरला लागलेली आग विझविण्यात फायर ब्रिगेडला तासाभरानंतर यश

दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांना समन्स

दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुका होत असताना गृह मंत्रालयाने हेरगिरी प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. अशा स्थितीत गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र, याआधी सीबीआय मनीष सिसोदिया यांची दारू घोटाळ्याप्रकरणी चौकशी करत आहे. याप्रकरणी सिसोदिया यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले आहेत.

याप्रकरणी सीबीआयने नुकतेच मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांनाही समन्स पाठवले आहे. 26 फेब्रुवारी रोजी तपास यंत्रणा दारू घोटाळ्याप्रकरणी सिसोदिया यांची चौकशी करणार आहे. याआधीही सीबीआयने मनीष सिसोदिया यांना समन्स पाठवले होते, मात्र त्यानंतर दिल्लीचे बजेट तयार करण्यात व्यस्त असल्याने त्यांना फेब्रुवारीच्या अखेरीस बोलावण्यात यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले होते. त्याच कारणामुळे आता सीबीआयने त्यांना 26 फेब्रुवारीला बोलावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com