Pune Crime ज्ञानेश्वर हिंगोलकर
मुंबई/पुणे

पुण्यात टक-टक टोळीची दहशत, दिवसाढवळ्या कारचालकांची करतायत लूट; चोरटे कॅमेऱ्यात कैद

स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांच्या हातावर तुरी देऊन या गँगने पुण्यातील मोटार मालकांची लुट केल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलकर -

पुणे: पुण्यात (Pune) मागील काही दिवसांपासून अका अनोख्या टक-टक टोळीने धुडगूस घातला आहे. ही टोळीने कार चालकांची लुट करण्याचा सपाटाच लावला आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांच्या हातावर तुरी देऊन या गँगने डेक्कन, लष्कर, बंडगार्डन, फरासखाना, विश्रामबाग परिसरातील मोटार मालकांची लुट केल्याची माहिती समोर आली आहे.

मोटार चालकाने लक्ष विचलित करून टक-टक गँगद्वारे गाडीतील ऐवजाची चोरी केली जात आहे. चुरगळलेल्या नोटा खाली फेकून चालकाला पैसे पडल्याचे सांगत लक्ष विचलित केले जाते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने चोरट्याच्या साथीदाराकडून मोटारीतील पर्स, पिशवी, लॅपटॉप, महागड्या वस्तू अलगदपणे चोरून नेल्या जात आहेत.

पाहा व्हिडीओ -

अशाच काही घटना डेक्कन, लष्करसह विविध पोलिस ठाण्यातंर्गत गर्दीच्या ठिकाणांवरील रस्त्यावर घडल्या आहेत. त्यामुळे मोटार मालकांसह चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून टक-टक गँगला पोलिसांनी अटकाव घालण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे टक-टक टोळीतील चोरट्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान आता पुणे पोलिसांसमोर (Pune Police) आहे.

या घटनेचे काही सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून या फुटेजमध्ये हे चोरटे चोरी कशी करतात हे दिसून येत आहे. शिवाय त्यांना कोणाचीही कसलीही भीती वाटत नसल्याचंही दिसतं आहे. त्यामुळे या चोरट्यांना पोलिसांचा कसलाच धाक नाही का? असा सवाल कार चालकांनी उपस्थित केला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

Maratha Reservation: आता मुंबईला जाणारे दूध,भाजीपाला बंद करू; मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंचा इशारा

SCROLL FOR NEXT