palhgar, palghar accident news saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : पालघरला दाेन भीषण घटना; मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार चालक ठार, लोवरेत डिझेल टँकर खाक

पाेलिसांनी घटनेची माहिती कळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

रुपेश पाटील

Palghar Accident News : पालघर जिल्ह्यात आज दाेन माेठ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. एक घटना पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (palghar mumbai ahmedabad highway accident news) घडली. येथे कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी घटना नागझरी मासवण रस्त्यावरील लोवरे येथे डिझेल भरलेल्या टँकरला भीषण आग लागली. यामध्ये डिझेल टँकर जळून संपूर्णपणे खाक झाला आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारने मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. उभ्या असलेल्या कंटेनरचा कार चालकाला अंदाज न आल्याने कंटेनरला कारची धडक बसली. हालोली पडोसपाडा येथे ही दुर्देवी घटना घडली. मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

डिझेल टँकरला भीषण आग

पालघर जवळील नागझरी मासवण रस्त्यावरील लोवरे येथे डिझेल भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची घटना घडली. यामध्ये डिझेल टँकर जळून संपूर्णपणे खाक झाला आहे. पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा एक्सप्रेस वे चे काम सुरू आहे. मोंटे कार्लो या ठेकेदार कंपनीच्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी आलेल्या डिझेलच्या टँकरला लोवरे स्टॉप या ठिकाणी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.

या टँकरमध्ये डिझेल भरलेले असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून नागझरी-मासवण मार्गावरील संपूर्ण वाहतूक थांबविण्यात आली. डिझेलच्या टँकरला लागलेल्या भीषण आगीने शेजारील घरातील नागरीकांची पळापळ झाली.

या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालघर पालिका आणि तारापूर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT