File Photo: Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Accident: विक्रोळीत भयानक कार अपघात; दोघांचा मृत्यू, तर ७ जण जखमी

Mumbai Accident News: आज, गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास हा अपघात घडला आहे.

सुरज सावंत

Vikhroli Car Accident: मुंबईच्या विक्रोळीमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात ७ जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या विक्रोळी दरम्यान इस्टर्न फ्री-वे वर इनोव्हा गाडीला भीषण अपघात झाला आहे. आज, गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. (Mumbai Latest News)

या गाडीमधील सर्वजण हे भिवंडी येथील ढाब्यावर जेवणासाठी निघाले होते. यावेळी मुंबईच्या विक्रोळी (Vikhroli) दरम्यान इस्टर्न फ्री-वे वर इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने आणि गाडी सर्विस रोडवरील झाडावर जाऊन आदळली. मुंबई नियंत्रण कक्षातर्फे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात शाहिद सलिम कुरेशी वय १८, आणि जुनेद सलीम कुरेशी वय २६ या दोन तरुणांचा मृत्यू झालेला आहे.

दरम्यान अपघातात आमान अब्दुल गफार कुरेशी-१९, साजिद अनिस अहेमद अन्सारी-१५, शाहिद मो. सलीम कुरेशी-१८, आयान कुरेशी-१८, कैफ शरीफ कुरेशी-१७, शाहिद अहमद अनीस अन्सारी-१७, अलीम जाकीर कुरेशी-२१ हे जखमी झालेले आहेत. ही सर्व मुलं कुर्लाच्या कुरेशी नगरमधील राहणारी असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंडेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

Weight Loss Drink: लिंबू पाणी की कोमट पाणी; वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Maharashtra News Live Update: भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT