Maharashtra Political News Updates Uddhav Thackeray On CM EknathShinde Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच माध्यामांशी सवांद साधला. यावेळी बोलताना त्यांनी तीन प्रश्न उपस्थित करत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले 'काल ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं आणि ज्यांनी हे सरकार बनवंल शिवाय तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं ते म्हणत आहेत.

मी त्यांना मागील अडीच वर्षापुर्वी हेच सांगत होतो की, आम्हाला अडीच वर्ष द्या. मात्र, त्यावेळी अमित शहा (Amit Shah) यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही. जर त्यावेळी मला दिलेला शब्द पाळला असता तर काल जे घडलं ते सन्मानाने घडलं असतं. भाजप किंवा शिवसेनेचा (Shivsena) मुख्यमंत्री झाला असता.

मात्र, त्यावेळी भाजपने (BJP) का नकार दिला हा माझ्यासह जनतेला पडलेला मोठा प्रश्न आहे. दरम्यान, पाठित वार करुन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला असं ते म्हणत आहेत. पण, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. असं म्हणत त्यांनी बंडखोरांना आणि मुख्यमंत्र्यांना सुनावलं.

हे देखील पाहा -

यावेळी ठाकरे यांनी कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलून मुंबईकरांच्या (Mumbai) काळजात खंजीर खुपसू नका. माझावर राग काढा, मुंबईवर राग काढू नका, मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका आधीचा निर्णय बदलू नका. मागेच आरे जंगलाची कत्तल झाली. मी कांजूर मार्गाचा पर्याय सुचवला आहे. कृपा करुन माझ्यावरचा मुंबईकरांवर काढू नका.

तुम्हाला हात जोडून विनंती करतो आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाचा ऱ्हास (Environmental Degradation करु नका. वरती खालती तुमचंच सरकार आहे. आरेचा मर्यादित वापर होणार आहे तो प्रस्ताव रेटू नका कांजूरमार्गचा प्रस्तावच नियमित करा. राज्याच्या हिताचा निर्णय घ्या. तसंच यावेळी त्यांनी आता लोकशाही वाचवायला लोकांनी समोर यायला हवं असंही आवाहन केलं.

दरम्यान, हे लोक माझ्याशी ज्या पद्धतीने वागले त्याचं मला दु:ख झालं आहे. माझ्या पाठित खुपसलेला सुरा मुंबईच्या काळजात खुपसू नका. मला मागील ८- १० दिवसामध्ये अनेक मेसेज आले. माझ्याबद्दल लोकांची भावना कळली त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे.तुमच्या डोळ्यातील अश्रुंशी कधीही प्रतारणा करणार नाही. सत्ता येवो जावो तुमच्यासारख प्रेम क्वचितच कोणाला लाभत असेल अशा भावना त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात मनोज जरांगेंचा एल्गार; काय आहे येवल्यातील मतांचं गणित? पाहा व्हिडिओ

Priyanka Gandhi : PM मोदींचं चॅलेंज प्रियंका गांधींनी स्वीकारलं; शिर्डीतील सभेत नेमकं काय घडलं? पाहा स्पेशल रिपोर्ट

Milk and Pohe: नाश्त्याला दूध आणि पोह्याचे सेवन करणे ठरते फायदेशीर

Govinda Health Update : प्रचारसभेत असताना गोविंदाची तब्येत बिघडली, अर्धवट सभा सोडून घरी परतला

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

SCROLL FOR NEXT