Chhagan Bhujbal Death threat saam tv
मुंबई/पुणे

Chhagan Bhujbal Threat: मोठी बातमी! कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

Satish Daud

Death threat to Chhagan Bhujbal: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. युती सरकारमधील कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने भुजबळ यांच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून आपल्याला सुपारी मिळाल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील ऑडिओ क्लिप देखील समोर आली आहे.

छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची (Death Threat) धमकी येताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्या मुंबईतील कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला.

यावेळी अज्ञात व्यक्तीने आपल्याला छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाली असल्याचा दावा केला. मी सर्व काम सांगून करतो. उद्या सकाळी छगन भुजबळ यांना मी मारणार, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिली.

इतकंच नाही तर या व्यक्तीने फोनवरून आपलं नाव देखील सांगितलं. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांत (Police) तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्वीटरवरून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना सुद्धा धमकीचा फोन आला होता. आता छगन भुजबळ यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune CCTV Footage : रस्ता खचला, पुणे पालिकेचा ट्रक खड्ड्यात गाडला गेला; थरारक VIDEO

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

SCROLL FOR NEXT