Manpada Police Saam tv
मुंबई/पुणे

दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

kalyan news : दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत व्यवसायिकासह वडिलांना बेदम मारहाण झाली.

Vishal Gangurde

दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या कारणावरून वाद पेटला

भंगार व्यवसायिकासह वडिलांना बेदम मारहाण

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवली देसलेपाडा परिसरात भंगार दुकानाबाहेर भंगार ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून भंगार व्यवसायिकाला वडिलांसह लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पंकज मौर्या व त्यांचे वडील विनोद मौर्या यांनी सागर कोटकर व त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देसलेपाडा येथील भंगार दुकानाबाहेर भंगार ठेवले असल्याने सागर कोटकर तेथे आला आणि दुकानाबाहेर भंगार का ठेवले आहे, असा जाब विचारत पंकज मौर्या यांना शिवीगाळ केली. यावेळी पंकज यांनी भंगार भरण्यासाठी गाडी येत असल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र याचा राग आल्याने सागर कोटकरने पंकज यांच्या उजव्या गालावर चापटीने मारहाण केली. त्यानंतर धक्का देऊन तो घटनास्थळावरून निघून गेला. या धक्क्यामुळे पंकज खाली पडले असून त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला खरचटले.

पंकज यांनी तात्काळ आपल्या वडील विनोद मौर्या यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला. काही वेळातच सागर कोटकर हा दोन अनोळखी व्यक्तीसह पुन्हा दुकानात आला. शिवीगाळ करत तिघांनीही दुकानात पडलेले लाकडी दांडक्याने विनोद मौर्या यांच्या उजव्या हातावर व पाठीवर बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेनंतर जखमींनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनतर आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत. मारहाणीच्या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT