Bhor Bus accident  Saam tv
मुंबई/पुणे

Bus Accident : सहलीवरून परतत असताना बसचा ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधानामुळे 34 विद्यार्थ्यांचे वाचले प्राण

बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात टळला

साम टिव्ही ब्युरो

Bhor News : अतिशय रहदारीच्या चौपाटी परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे खासगी ट्रॅव्हल बसचा अपघात टळला. या अपघातात ३४ विद्यार्थ्यांसह अनेकांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मोरगाव येथील एका खासग क्लासेसमधील ३४ विद्यार्थी व शिक्षक हे खासगी ट्रॅव्हल बस ही मधून मांढरदेवी व रायगडला सहलीला निघाले होते. शनिवारी सकाळी ते मांढरदेवीच्या दर्शनाला गेले. मांढरदेवीचे दर्शन घेऊन अंबाडखींड घाटातून ते भोरमार्गे महाडला निघाले होते.

शहरातील चौपाटील परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मांढरदेवी बाजूकडून महाड बाजूकडे वळताना बसचा ब्रेक निकामी झाला. सुदैवाने वळणावर बसचा वेग खूप कमी होता. परंतु रस्ता थोडा उताराचा असल्यामुळे बसने वेग घेण्यास सुरुवात केली. ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने हँड ब्रेक लावून मुलांना ओरडून सांगत खाली उडी घेतली.

ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने हॅन्ड ब्रेक लावून मुलांना ओरडून सांगत खाली उडी घेतली. त्यानंतर रस्त्यावरील नागरिकांच्या व व्यावसायिकांच्या मदतीने चाकासमोर दगड ठेवले.त्यामुळे बस (Bus) रस्त्यावरच थांबली आणि पुढील अनर्थ टळला. तोपर्यंत बसमधील काही विद्यार्थी खाली उतरले होते. भोर (Bhor) शहरातील सर्वात रहदारीचा रस्त्यावर सुदैवाने कोणतीही जीवीत व वित्तहाणी झाली नाही. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दरम्यान, भोर पोलिस ठाण्याचे पोलिस सुनील चव्हाण व शौकत शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचून बस चालक तसेच विद्यार्थ्यांना धीर दिला. रस्त्यावरील झालेले ट्राफिक बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी मोकळा केला.

मांढरदेवीच्या अपघाताची आठवण

भोर-मांढरदेवी मार्गावरील अंबाडखींड घाटात २००६ साली एसटी कोसळून काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यात अनेक जण जखमी झाले होते. या घटनेची आठवण भोरवासीयांना शनिवारी झाली. सुदैवाने विद्यार्थ्यांची बस अंबाडखींड घाटातून सुखरुप खाली आली आणि भोर शहरात तिचे ब्रेक निकामी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT