Nus Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai-Pune Highway Accident Update : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस दरीत कोसळली; 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू, 27 जण जखमी

Mumbai-Pune Highway Bus Accident: पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

दिलीप कांबळे

Mumbai-Pune Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई  महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. खासगी बस थेट दरीत कोसळली आहे. पहाटे 4 वाजेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 12 ते 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती राजगड महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी दिली. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest News)

पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती. बसमध्ये 41 जण प्रवास करत होते अशी माहितीही पोलीस अधीक्षकांना दिली आहे. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. (Bus Accident)

मदतकार्यासाठी हायकर्स ग्रुप, आयआरबी टीमला पाचारण करण्यात आलं आहे. खाजगी रुग्णालयातील डॅाक्टर्सना मदतीसाठी बोलवण्यात आलं आहे. खाजगी बसमध्ये बाजी प्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव(मुंबई) येथील असून पुण्याचा कार्यक्रम संपवून गोरेगाव येथे जात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT