Mumbai News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime: खिडकीतून घुसून मॅकडोनाल्डमध्ये चोरी; संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, २ तासात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Crime News Mumbai: मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Shivani Tichkule

संजय गडदे

Andheri Crime News: मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मॅकडोनाल्ड शॉपमध्ये देखील चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मॅकडोनाल्ड शॉपच्या बंद खिडकीतून आत घुसून दोन चोरांनी गल्ल्यातील रक्कम चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवली आणि आरोपींना अवघ्या दोन तासात अटक केली आहे. विजय पाले (29 वर्षे) आणि प्रणिकेत भोसले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 1 वाजता मॅकडोनाल्ड शॉप बंद करून कर्मचारी घरी निघून गेले. जाताना दरवाज्याच्या बाजूची खिडकी दूध घेण्यासाठी शटर न लावत नेहमीप्रमाणे लावून ठेवली. त्यावेळी दुकानातील सफाई कर्मचारी लॉबीमध्ये साफसाफाई करू लागले.

दरम्यान 3.10 वाजताचे सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्ती कॅश काऊंटरमधून चोरी करत असल्याचे एका कामगाराने पाहिले. सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासणी करून पाहिले असता दोन अज्ञात व्यक्ती चोरी करताना दिसून आले. त्याने तात्काळ अंधेरी (Andheri) पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (Crime News)

अंधेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोउपनि अमित यादव, पो. शि. प्रविण कांबळ, पो.शि अविनाश जाधव, पो.शि. दत्ता टरके, पो.शि. वसंत नरबट यांनी घटनास्थळावर जाऊन सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींची ओळख पटवली आणि गुप्त बातमीदाराच्या मदतीने आरोपींचा ठिकाण शोधून काढून आरोपींना अवघ्या दोन तासात अटक केली आहे सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना आज न्यायालयात नेले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skincare Routine: पन्नाशीतही सुंदर आणि ग्लोइंग स्किन मिळवायचीये? मग माधुरीच्या या टिप्स करा फॉलो

ऐन दिवाळीत कोल्हापुरात अघोरी प्रकार; जनावराचं काळीज पांढऱ्या कापडात बांधलं, बाजूला कुंकू, हळद अन्...

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

SCROLL FOR NEXT