Nashik News: महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची केल्याची घटना शनिवारी रात्री ९ वाजण्यच्या सुमारास घडली. मनसे विद्यार्थी नेते अमित ठाकरे यांचा ताफा या ठिकाणाहून जात असताना टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर मनसे कार्यकत्यांनी तोडफोड केली. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने अर्धा तास थांबवला, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. तसेच टोलनाक्याची तोडफोड शनिवारी रात्री केली. या घटनेनंतर नाशिकचे एसपी ग्रामीण घटनास्थळी पोहोचले.
टोलनाका का फोडला?
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्या कारचं फास्टटॅग काळ्या यादीत होतं. त्यामुळे अमित ठाकरे यांचा ताफा टोलनाक्याजवळ आला, त्यावेळी फास्टटॅगने पैसे भरले गेले नाहीत. त्यामुळे त्यांची गाडी अडविण्यात आली. यावेळी भडकलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडला.
दरम्यान, मनसे नेते , माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी या झालेल्या घटनेवर भाष्य केलं. बाळा नांदगावकर म्हणाले, 'मला माहिती तुमच्याकडून मिळाली. मी तेथील पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. अमित ठाकरे यांच्या कारला फास्टटॅग आहे. त्यामुळे टोलनाक्यावर समस्या येत नाही. टोलनाक्यावरील खांबामध्ये तांत्रिक बिघाड असावा. त्यामुळे पैसे भरले गेले नसावे'.
'टोलनाक्यावरील कर्मचारी उद्धटपणे बोलले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांनी उद्धट बोलायला नको होतं. नेत्यांच्या प्रेमापोटी कार्यकर्त्यांना राग अनावर झाला, असे बाळा नांदगावकर पुढे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.