Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

अभिनेते पुष्कर जोग यांच्या आईवर पुण्यात गुन्हा दाखल; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

या प्रकरणात जिल्हा परिषदेचे आणखी काही बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : जोग एज्युकेशनच्या अकरा शाळांसाठी (schools) शिक्षण अधिकाऱ्यांचे खोट्या सह्या करून स्व मान्यता प्रमाणपत्र तयार करून कोट्यावधी रुपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोग (pushkar jog) यांच्या माताेश्री जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग (surekha jog) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (pune latest marathi news)

या प्रकरणी जोगांसह पुणे (pune) जिल्हा परिषदेच्या तीन अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात (bundgarden police station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ११ बनावट शाळांकडून विद्यार्थ्यांसह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे.

पाेलीसांनी दिलेल्या अधिक माहितीनूसार जोग एज्युकेशन ट्रस्ट (jog education trust) तर्फे चालविल्या जाणाऱ्या ११ शाळांची बनावट कागदपत्र तयार करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग एज्युकेशन ट्रस्ट तर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांची खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून शाळांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई टाळण्यासाठी जोग एज्युकेशन ट्रस्टने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्याकडे सादर केली आहेत. तसेच या अकरा शाळांच्या मुख्याध्यापकाद्वारे 25 टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांचे प्रतिशुल्क मिळवण्यासाठी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे प्रस्ताव सादर करून शिक्षण विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षण विभागातील अधिकारी किसन दतोबा भुजबळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बंडगार्डन पोलिसांनी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सुरेखा जोग तसेच गौतम शंकर शडगे, किशोर पवार, हेमंत सावळकर यांच्या विरोधात कलम ४२० सह विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

SCROLL FOR NEXT