Bullet Train Saam Tv
मुंबई/पुणे

Bullet Train: मुंबई पुणे फक्त ४८ मिनिटांत; अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी धावणार? रेल्वे मंत्र्यांनी तारीखच सांगितली

Mumbai-Ahmedabad Bullet Train Starting Date: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरु होणार असा प्रश्न लोकसभेत विचारण्यात आला होता. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे.

Siddhi Hande

रेल्वे मंत्र्यांची बुलेट ट्रेनबाबत माहिती

बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरु होणार

बुलेट ट्रेनमुळे प्रवास जलद होणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. बुलेट ट्रेन कधी सुरु होणार याबाबत माहिती दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रेल्वे मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्यांवर लोकसभेत चर्चा होत आहे. यामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बुलेट ट्रेनचे काम कधी पूर्ण होणार ,याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, २०२७ पर्यंत पहिला टप्पा सुरु करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

पाण्याखालील बोगद्याचे काम सुरु

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांना रेल्वे मंत्र्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. रेल्वे मार्ग, गर्डर आणि पुलांच्या कामांची आकडेवारी त्यांनी सांगितले. कोलकत्ता मेट्रोच्या पाण्याखाली बोगद्याच्या धर्तीवर पहिला बोगदा बांधला जात आहे. या २१ किलोमीटरच्या बोगद्यापैकी पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. २०२७ पर्यंत पहिला टप्पा सुरु करण्याचे लक्ष्य आहे.

बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. ही ट्रेन ताशी ३५० किलोमीटर वेगाने धावणार आहे. अर्थसंकल्पात नवीन ७ बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई पुणे प्रवास फक्त ४८ मिनिटांत (Mumbai-Pune in Just 48 Minutes)

नवीन प्रकल्पांमुळे बुलेट ट्रेनचे जाळे चार हजार किलोमीटरपर्यंत पोहचणार आहे. या ट्रेनमुळे मुंबई पुणे प्रवास ४८ मिनिटांत होणार आहे. दिल्ली ते वाराणसी प्रवास साडेतीन तासात, दिल्ली ते लखनऊ प्रवासाला दोन तास लागणार आहे. वाराणसी ते पाटणा प्रवास १ तासाच्या आतमध्ये होणार आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, पुणे ते हैदराबादचा प्रवास दोन तासांचा होणार आहे. हैदराबाद ते बंगळुरु प्रवास दोन तासांचा तर बंगळुरु ते चेन्नईला पोहचण्यासाठी फक्त ७३ मिनिटे लागणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होणार आहे. ही देशातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT