Pimpri Chinchwad Viral Video Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : रस्त्यावर निवांत गप्पा मारत होती व्यक्ती; मागून हळूच आला बैल अन्.., VIDEO पाहून चक्रावून जाल

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क शिंगावर घेऊन उचलून फेकलं आहे.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Bull Viral Video : बैल हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तुम्ही आपलं काम करा, मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगतो. पण, एकदा का बैलाला राग आला की मग काही खरं नाही. बैलाने रागात व्यक्तीला उचलून फेकल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, अशाच एका संतापलेल्या बैलाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

या बैलाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या व्यक्तीला चक्क शिंगावर घेऊन उचलून फेकलं आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Viral Video) झाला आहे. सुदैवाने या घटनेत व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्याला मुका मार लागल्याचं परिसरातील नागरिकांकडून सांगितलं जातं आहे.

अंगावर काटा आणणारी ही घटना पिंपरी-चिंडवड (Pimpri Chinchwad) शहरात घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी गावात नव महाराष्ट्र् विद्यालयाच्या मागे व वाघेरे कॉलोनी रस्त्यावर मोकाट जनावरे व कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरे वाहनधारकांना त्रास देत आहेत.

व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेला उभे राहून निवांत गप्पा मारताना दिसून येत आहे. यादरम्यान, एक मोकाट बैल रस्ता ओलांडून हळूच त्यांच्याकडे येतो. काही समजण्याच्या आतच हा बैल उभ्या असलेल्या दोन व्यक्तीपैकी एकाला शिंगावर उचलून घेतो आणि दूर फेकतो.

ही घटना घडल्यावर लगेच आजूबाजूचे लोक पळत येतात आणि या व्यक्तीला उचलून बाजूला करतात. सुदैवाने या व्यक्तीला घटनेत कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, तरी देखील त्यांना मुका मार लागला असल्याचं सांगितलं जातंय. अंगावर काटा आणणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT