Porsche Car Accident Pune Update: Builder Vishal Agarwal's Son Be Prosecuted As Adult Pune Police Will Demand In Court Saam TV
मुंबई/पुणे

Porsche Accident Pune: बिल्डरच्या मुलावर 'सज्ञान' म्हणून खटला चालवू द्या; पुणे पोलीस कोर्टात करणार मागणी

Pune Porsche Car Accident News: बिल्डर विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलावर 'सज्ञान' म्हणून खटला चालवू द्या, अशी मागणी पुणे पोलीस बाल हक्क न्यायालयाकडे करणार आहेत.

Satish Daud

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, अल्पवयीन मुलावर 'सज्ञान' म्हणून खटला चालवू द्या, अशी मागणी पुणे पोलीस बाल हक्क न्यायालयाकडे करणार आहेत.

पोलिसांची ही मागणी कोर्टाने मान्य केल्यास अल्पवयीन मुलाला तातडीने अटक होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही, तर पुणे पोलिसांकडून वेदांत अग्रवालला आज बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी नोटीसही पाठवण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलगा कोर्टात हजर न राहिल्यास त्याला फरार घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी वकिलामार्फेत पाठवलेल्या नोटीसीत तसा उल्लेख केला आहे. त्यामुळे दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाचे पाय आणखीच खोलात जाण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्या शनिवारी पोर्शे कारचा भीषण अपघात झाला होता. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन सुसाट वेगाने कार चालवत दोन जणांचा जीव घेतला होता. हिट अँड रनच्या या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी तातडीने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं. त्याला बाल हक्क न्यायालयासमोर हजर केलं असता, कोर्टाने त्याला ट्रॅफिकचे नियम आणि ३०० शब्दाचा निबंध लिहण्याची शिक्षा दिली. कोर्टाच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, परवाना नसतानाही अल्पवयीन मुलाच्या हातात कार दिल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर संभाजीनगर येथून त्यांना अटकही करण्यात आली. आज अग्रवाल पिता-पुत्रांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT