D S Kulkarni  Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! डीएसकेंना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर; लवकरच सुटका होणार?

डीएसके यांची लवकरच तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : प्रसिद्ध उद्योगपती आणि पुण्यातले बिल्डर डी.एस.कुलकर्णी यांना आणखी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. डीएसके यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. माहितीनुसार मुख्य प्रकरणामध्ये त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आलाय. त्यामुळे डीएसके यांची लवकरच तुरूंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. (DSK Granted Bail Latest News)

काही दिवसांपूर्वी डीएसके यांना मोफा प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यातच आता सुप्रीम कोर्टाने मुख्य प्रकरणात त्यांना आज जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची जामीनासाठी धावपळ सुरू होती. ती धावपळ आता कुठेतरी संपताना दिसतेय. दरम्यान, हा जामीन मंजूर झाला असला तरी अजून चार प्रकरणांमध्ये डीएसके यांना जामीन मिळणं बाकी आहे.

काय आहे प्रकरण?

ग्राहकांकडून अनामत रक्कम घेवून त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही, अशा आरोपाखाली डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

दरम्यान, ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य गुन्ह्यातील आरोपी डीएसके आणि इतर आरोपी १७ फेब्रुवारी २०१८ पासून तुरुंगात आहेत. डीसके यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे वकील आशुतोष श्रीवास्तव आणि वकील रितेश येवलेकर यांनी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने डीएसके यांच्या वकीलांची बाजून ऐकून घेतल्यानंतर आता त्यांना जामीन मंजूर केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

IPPB Recruitment: इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत नोकरीची संधी; ३४८ पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळ याला परदेशातून आणण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Painkiller Side Effects: तुम्हाला कल्पनाही नसेल इतकी पेनकिलर आरोग्यावर करते परिणाम

SCROLL FOR NEXT