beed crime  Saam Tv
मुंबई/पुणे

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

beed crime : बीडमध्ये लोकांचं भय इथले संपत नाही. किरकोळ कारणांवरून तरुणाला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या तरुणावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Vishal Gangurde

बीडमध्ये अत्याचाराच्या घटना थांबेना

तरुणाला अमानुष मारहाण

नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली घटना

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाण आणि अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबायच्या नाव घेत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. किरकोळ कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यानी अमानुषपणे मारहाण करण्यात आलीये. ही घटना नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खर्डेवाडी गावात तीन दिवसांपूर्वी घडली आहे.

संदीप आहेर असं जखमी तरुणाचे नाव आहे. या जखमी तरुणावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील धनराज भोसले याने रात्रीच्या सुमारास ही अमानुष मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपी धनराज भोसले याची गावात मोठी दहशत आहे. त्याने अनेक जणांना यापूर्वीदेखील गावात मारहाण केली होती.

धनराज भोसले रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणाच्या घरी गेला. त्याने सुरुवातीला शिवीगाळ केली. त्यानंतर लोखंडी रॉड आणि लाकडी दांड्यानी पीडित तरुणाला घरासमोरच अमानुष मारहाण केली. आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. या प्रकरणाचा तपास आता नेकनूर पोलीस करत आहेत.

बीडमधील गुन्हेगारी कधी संपणार?

बीडमध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने तरुणांना अमानुष मारहाणीच्या घटना उघडकीस येत आहे. सामान्य तरुणांना सातत्याने मारहाण होत असल्यामुळे बीडमधील जनता दहशतीत आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना उघडकीस आल्याने नागरिकांकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी कधी संपणार, अशी विचारणा देखील नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

ठाकरेंची युती धोक्यात? मनसे शिंदेंसोबत गेल्यानं ठाकरे भाजपसोबत?

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा २५ जानेवारी रोजी होणार

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बस चालकाकडून ४ वर्षीय मुलीवर अत्याचार

यमुना नदीत कालिया नाग पुन्हा दिसला? महाकाय कालिया नागांमुळे दहशत?

SCROLL FOR NEXT