Ghodegaon Police Station  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: दुर्दैवी! खेकडे पकडायला जाणं जीवावर बेतलं, सख्ख्या बहीण-भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

रोहिदास गाडगे

Ambegaon News: ओढ्यामध्ये खेकडे (Crabs) पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीण-भावांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातल्या आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील गंगापूर गावामध्ये ही घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी हे दोघेही खेकडे पकडण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह ओढ्याबाहेर काढण्यात आले आहेत. घोडेगाव पोलिसांकडून (Ghodegaon Police) याप्रकरणाचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर गावातील गाडेकरवाडीमध्ये राहणारी अंजली काळे (14 वर्षे) आणि तिचा छोटा भाऊ दिगू काळे (12 वर्षे) हे दोघे शुक्रवारी सकाळी खेकडे पकडण्यासाठी नजीकच्या ओढ्यामध्ये गेले होते. खेकडे पकडत असताना दिगूचा पाय घसरुन तो ओढ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी अंजलीने पाण्यामध्ये उडी मारली. पण पाणी खोल असल्यामुळे दोघांचा देखील बुडून मृत्यू झाला आहे.

घटनेचा माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घोडेगाव पोलिसांनी घटनास्थळ धाव घेत स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. दोन्ही मुलं गमावल्यामुळे काळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणाचा तपास घोडेगाव पोलिसांकडून सुरु आहे.

दरम्यान, नांदेडमध्ये १ ऑगस्टला अशीच घटना घडली होती. रात्री गावाजवळ असलेल्या ओढ्यात खेकडे पकडायला गेलेल्या तरुणांचा मृत्यू झाला. मुखेड तालुक्यातील सकनूर गावामध्ये ही घटना घडली. विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी सुरूणवाड आणि संभाजी नागरवाड अशी या मृत तरुणांची नावं आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कास पठारावर फुलांच्या रंगोत्सवाला झाली सुरुवात, पर्यटकांची गर्दी

Special Story : 'लाडक्या बहिणीं'साठी राज्य सरकारांची स्पर्धा; कोणत्या राज्यात किती दिले जातात पैसे? वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi 5: 100 दिवसांचा बिग बॉस मराठीचा शो आता 70 दिवसांत उरकणार? समोर आली ग्रँड फिनालेची तारीख

NCP Party Crisis : घड्याळ चिन्हामुळं कन्फ्युजन होतंय? सुप्रिया सुळेंनी नेमकं काय सांगितलं, पाहा VIDEO

Aditi-Siddharth:लग्नानंतर अदिती-सिद्धार्थ मुंबईत परतले; नववधूच्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

SCROLL FOR NEXT