विवाहित मामेबहिणी सोबत अनैतिक सबंध; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्...
विवाहित मामेबहिणी सोबत अनैतिक सबंध; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्... Saam Tv
मुंबई/पुणे

विवाहित मामेबहिणी सोबत अनैतिक सबंध; नवरा घरी नसताना भेटायला आला अन्...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्याजवळच असलेल्या तळेगाव परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या ठिकाणी एका तरुणाने आपल्या विवाहित मामेबहिणीवरच एक नाही दोन नाहीतर तब्बल अडीच वर्षे अत्याचार केला आहे. या पीडित महिलेवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ तुझ्या पतीला दाखवणार, अशी धमकी देत आरोपीने पीडितेवर खूप वेळा अत्याचार केला आहे.

मागील अडीच वर्षांपासून आरोपी आपल्याच मामेबहिणीचे लैंगिक शोषण करत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून शेवटी 34 वर्षीय पीडित मामेबहिणीने आपल्या आतेभावा विरोधामध्ये पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडित बहिणीच्या तक्रारीनंतर, तळेगाव पोलिसांनी आरोपी आतेभावा विरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल FIR दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

आरोपी तरुणाला पोलिसांनी अद्याप अटक केली नसून, या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी विवाहित असून, पुणे जिल्ह्यामधील तळेगाव परिसरात वास्तव्याला आहे. दरम्यान एकेदिवशी आरोपी आतेभाऊ पीडितेच्या घरी आला होता. यावेळी पीडित महिलेचा नवरा घरी नव्हता. घरी नवरा नसल्याची संधी साधून आरोपी आतेभावाने पीडित महिलेवर बळजबरी करत, तिच्यावर बलात्कार केला होता.

नराधम आरोपी यावरच थांबला नाही. तर त्याने फिर्यादीवर बलात्कार करतानाचे व्हिडीओ आपल्या मोबाइल मध्ये रेकॉर्ड केले होते. यानंतर आरोपीने संबंधित व्हिडीओ पीडितेच्या नवऱ्याला आणि नातेवाईकांना दाखवण्याची सतत धमकी दिली जात होती. आणि वारंवार बलात्कार करत असत. यानंतर घाबरलेल्या विवाहित बहिणीवर आतेभावाने अनेकदा बलात्कार केला आहे.

मागील अडीच वर्षांपासून भाऊ पीडितेला त्रास देत होता. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी बलात्काराबरोबरच अन्य काही कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने जानेवारी २०१९ पासून जून २०२१ पर्यंत अनेकदा बलात्कार केल्याचे फिर्यादीने आपल्या तक्रारीत सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Loksabha: बारामतीत प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! ५० वर्षांनंतर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान बदललं; दादांनी मारली बाजी

Mumbai News: मुंबईत सापडला बनावट नोटांचा कारखाना; निवडणुकीच्या धामधुमीत पोलिसांची मोठी कारवाई, दोघांना अटक

Buldhana Crime News: संतापजनक! दुचाकीस्वाराला धडक दिली, जखमीला उपचारासाठी नेतो सांगून दरीत फेकलं; आरोपीला अटक

Diabetes Problem : डायबेटीजने त्रस्त महिलांनी हे फळ रोज खावे; रक्तातील साखर लगेचच कंट्रोलमध्ये येणार

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT